Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

शाकिब अल हसनचा करिष्मा, T20 मध्ये अशी कामगिरी जगातील बनला 5 वा क्रिकेटर!

दैनिक गोमन्तक

शाकिब अल हसनची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होत नाही. मात्र यावेळी त्याने अवघी एक विकेट घेत या यादीत आपले नाव समाविष्ट केले असून, त्यात समाविष्ट होणारा तो जगातील 5 वा क्रिकेटपटू ठरला आहे. 24 जानेवारी रोजी फॉर्च्युन बरीशाल आणि मिनिस्टर ग्रुप ढाका यांच्यात झालेल्या बांगलादेश (Bangladesh) प्रीमियर लीग सामन्यात शाकिबने (Shakib Al Hasan) ही एक बहुमोल विकेट घेतली होती. (Shakib Al Hasan Became The Fifth Cricketer To Complete 400 Wickets In T20 Cricket)

दरम्यान, या सामन्यात फॉर्च्युन बरसालचा कर्णधार शाकिबने मिनिस्टर ग्रुप ढाकाचा कर्णधार महमुदुल्लाहची विकेट घेतली. या एका विकेटसह शाकिबने टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट पूर्ण केल्या. पुरुषांच्या T20 मध्ये ही कामगिरी करणारा तो जगातील केवळ 5 वा गोलंदाज ठरला आहे.

तसेच, टी-20 मध्ये 400 विकेट घेणारा शाकिब हा पहिला डावखुरा खेळाडू आहे. याशिवाय तो T20 मध्ये सर्वात जलद 5000 धावा आणि 400 विकेट घेणारा खेळाडू बनला आहे. हे स्थान मिळवणारा तो ड्वेन ब्राव्होनंतरचा (Dwayne Bravo) दुसरा खेळाडू बनला आहे.

शिवाय, 21.17 च्या सरासरीने आणि 6.80 च्या इकॉनॉमीसह 400 टी-20 विकेट्स घेत, शकीबने यादीत 5 वे गोलंदाज म्हणून आपले नाव कोरले आहे, ज्यामध्ये धोनीचा मित्र म्हणजेच ड्वेन ब्राव्हो आहे, जो आयपीएल संघ CSK मध्ये एकत्र खेळला होता. ड्वेन ब्राव्होने आतापर्यंत 24.42 च्या सरासरीने आणि 8.21 च्या इकॉनॉमीने 554 टी-20 विकेट घेतल्या आहेत. 400 टी-20 विकेट्स घेणाऱ्या पुरुष गोलंदाजांच्या यादीत इम्रान ताहिर (435 विकेट) दुसऱ्या क्रमांकावर, सुनील नरेन (425 बळी) तिसऱ्या क्रमांकावर आणि राशिद खान (Rashid Khan) (420 बळी) चौथ्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT