Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya: पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बनला पांड्याचा जबरा फॅन, पाक ची टीम...

Pakistan Cricket Team: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे चाहते जगभरात आहेत.

दैनिक गोमन्तक

Shahid Afridi on Hardik Pandya: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे चाहते जगभरात आहेत, पण आता पाकिस्तानचा दिग्गज आणि माजी कर्णधारही या यादीत सामील झाला आहे. पाकिस्तानसाठी 500 हून अधिक सामने खेळलेल्या शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, सध्याच्या पाकिस्तान संघात हार्दिक पांड्यासारख्या फिनिशरची कमतरता आहे. हार्दिक गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे.

पाकिस्तानच्या कामगिरीबद्दल चिंता

आशिया कप-2022 मध्ये पाकिस्तान (Pakistan) संघाने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला, परंतु अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकूनही पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावला. पाकिस्तानी संघ सध्या इंग्लंडविरुद्ध सात सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. चार सामन्यांनंतर मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत आहे. पाकिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याचेही शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.

'आमच्याकडे पांड्या नाही'

शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) समा टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'आमच्याकडे असा फिनिशर (Hardik Pandya) नाही. असिफ अली आणि खुशदिल हे आपला जलवा दाखवू शकतील असे आम्हाला वाटले, पण तसे झाले नाही. नवाजही तेवढा सक्षम नाही आणि शादाब खानही नाही. या चारपैकी किमान दोन खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. ज्या दिवशी शादाब शानदार कामगिरी करतो तेव्हा, संघही जिंकतो.'

हार्दिक ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने नाबाद 71 धावांची खेळी केली. दुसऱ्या T20 मध्ये त्याने फक्त 9 धावा केल्या, पण तिसऱ्या T20 सामन्यात त्याने 25 धावांची नाबाद इनिंग खेळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयासह भारताने टी-20 मालिकेतही ऑस्ट्रेलियाचा (Australia) 2-1 असा पराभव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

"जेवढं अंतर जास्ती, तेवढं लग्न यशस्वी", 58व्या वर्षी अरबाज खानला 'कन्यारत्न'; शूरा खानचं वय काय?

Goa AAP: अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा फटका; बाणावलीतील दोन मोठ्या नेत्यांसह समर्थकांचा राजीनामा

Vasco: वास्कोत वाहतूक व्यवस्था कोलमडली! रस्त्याकडेला वाहने पार्क; खात्याने लक्ष देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT