Shadab Khan Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket: बाबर आझमला मोठा झटका, शादाब खान बनला टीम पाकिस्तानचा नवा कर्णधार

Shadab Khan: पाकिस्तानी संघाला आता काही दिवसांनंतर अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. याआधी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Shadab Khan PCB Najam Sethi, Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग सध्या पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे आणि जवळपास सर्वच मोठे खेळाडू त्यात सहभागी होत आहेत.

त्याचवेळी, पाकिस्तानी संघाला आता काही दिवसांनंतर अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. याआधी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

आता काही वेळापूर्वीच पीसीबीने शादाब खान (Shadab Khan) संघाचा नवा कर्णधार असल्याची घोषणा केली आहे. कर्णधारासोबतच संघातील 15 सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे.

पण या संघाची खास बाब म्हणजे बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवानसोबत शाहीन शाह आफ्रिदीचे नाव नाही.

शादाब खान पाकिस्तान संघाची धुरा सांभाळणार आहे

शादाब खान अफगाणिस्तानविरुद्ध संघाची कमान सांभाळताना दिसणार असल्याची घोषणा पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी केली आहे. पीएसएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आल्याचेही नजम सेठी म्हणाले.

तसेच, बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना या संघात ठेवण्यात आलेले नाही. या सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच कर्णधारपदाची जबाबदारी शादाब खानकडे देण्यात आली आहे.

दुसरीकडे, शादाब खान गेल्या काही काळापासून पाकिस्तानी संघाचा उपकर्णधार आहे. पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी सांगितले की, मोहम्मद युसूफ यांची शारजाह दौऱ्यासाठी संघाचे अंतरिम प्रमुख आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, मोहम्मद युसूफ गेल्या वर्षभरापासून फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यामागील कारणे सांगताना मुख्य सिलेक्टर्स हारुन रशीद म्हणाले की, आम्ही मुख्य खेळाडूंना विश्रांती देऊन मानक रोटेशन धोरणाचे पालन केले आहे. उच्च कामगिरी करणाऱ्या देशांतर्गत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिभा आणि क्षमता दाखवण्यासाठी संधी दिली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ: शादाब खान (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आझम खान, फहीम अश्रफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्लाह, इमाद वसीम, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह,

सैम अयुब, शान मसूद, तय्यब ताहिर, जमान खान,

राखीव खेळाडू: अबरार अहमद, हसिबुल्लाह आणि उसामा मीर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT