Spanish Club Sevilla Dainik Gomantak
क्रीडा

UEFA Europa League Final: सेव्हिलाने सातव्यांदा जिंकली युरोपा लीग, जोस मोरिन्होने फेकून दिले सिल्वर मेडल

Manish Jadhav

UEFA Europa League Final: स्पेनच्या क्लब सेव्हिलाने सातव्यांदा यूईएफए युरोपा लीग (UEFA Europa League) जिंकली. सेव्हिलाचा संघ सातव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. विशेष म्हणजे, त्यांनी आपला शानदार रेकॉर्ड कायम ठेवला.

बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या लढतीत सेव्हिलाने इटलीच्या (Italy) क्लब एस रोमाचा दारुण पराभव केला. रोमाचा संघ 1991 नंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्यांना दुसऱ्यांदाही पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, रोमाचे व्यवस्थापक जोस मोरिन्हो सहाव्यांदा आपल्या संघासह युरोपियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यांना पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले.

सेव्हिलाविरुद्धच्या पराभवानंतर मोरिन्हो यांनी आपले रौप्यपदक स्वीकारले नाही. त्यांनी रौप्य पदक थेट स्टेडियममध्ये बसलेल्या एका चाहत्याकडे फेकले. मॉरिन्हो यांनी गेल्या वर्षी कॉन्फ्रेंस लीगमध्ये रोमाला विजय मिळवून दिला होता. मात्र, त्यांना सलग दुसरे युरोपियन जेतेपद जिंकता आले नाही.

रोमाच्या पाउलो डायबालाने 34 व्या मिनिटाला पहिला गोल केला

सामन्यात रोमाच्या पाउलो डायबालाने 34 व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र, ही आघाडी हाफ टाइमपर्यंत कायम राहिली. उत्तरार्धात सामना सुरु झाला तेव्हा रोमाच्या खेळाडूंच्या मदतीने सेव्हिलाचा संघ सामन्यात परतला.

रोमाचा अनुभवी खेळाडू जियानलुका मॅन्सिनीने 55 व्या मिनिटाला आत्मघाती गोल केला. त्याच्याच गोलमुळे सेव्हिलाने सामन्यात पुनरागमन केले आणि स्कोअर 1-1 असा बरोबरीत राहिला.

सेव्हिलाच्या गोलरक्षकाने संघाला विजय मिळवून दिला

निर्धारित 90 मिनिटे सामना 1-1 असा बरोबरीत असताना सामना अतिरिक्त वेळेत गेला. मात्र, तिथेही एकही गोल झाला नाही. अशा स्थितीत सामना शूटआऊटपर्यंत पोहोचला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये सेव्हिलाचा गोलरक्षक यासीन बुओनोने शानदार कामगिरी केली. त्याने दोन सेव्ह केले. अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलने सेव्हिलासाठी विजयी पेनल्टीवर गोल केला.

गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याने अर्जेंटिनासाठी (Argentina) विश्वचषकात विजयी पेनल्टी किकही मारली होती. रोमासाठी मॅनसिनी आणि रॉजर इबानेझचे पेनल्टी शूटआऊट चुकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ इथेच का हवा आहे? दबावामुळे स्थानिक संतप्त; बैठकीसाठी सरसावल्या बाह्या

SCROLL FOR NEXT