Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: रोहित शर्मा विश्वविजेता कर्णधार होणार? प्रसिद्ध ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबोंची भविष्यवाणी

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या विजेत्याबद्दल वैज्ञानिक ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Pranali Kodre

Scientific astrologer Greenstone Lobo predicted winner of ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता अगदीच तोंडावर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच अनेकांनी या वर्ल्डकपच्या विजेतेपदासाठी दावेदार संघांचे अंदाजही बांधायला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता प्रसिद्ध वैज्ञानिक ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

यावर्षी वनडे वर्ल्डकपचे 13 वे पर्व असून ही स्पर्धा यंदा भारतात खेळवली जाणार आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे.

या वर्ल्डकपच्या विजेत्याबद्दलचे अंदाज सांगताना लोबो यांनी असा दावा केला आहे की 1987 साली जन्मलेला कर्णधार विजेतेपद मिळवेल. रिपोर्ट्सनुसार लोबो यांनी यापूर्वी 2011, 2015 आणि 2019 क्रिकेट वर्ल्डकपवेळी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.

दरम्यान, आता टाईम्स ऑफ इंडियाच्या एका व्हिडिओमध्ये लोबो यांनी 2023 वर्ल्डकप भारताचा कर्णधार रोहित शर्मा जिंकू शकतो अशी भविष्यवाणी केली आहे. लोबो यांनी काही उदाहरणेही देत रोहित विश्वविजेता कर्णधार बनू शकतो असा निष्कर्ष दिला आहे. तसेच त्यांनी यापूर्वीच्या वर्ल्डकपमधील त्यांच्या भविष्यवाणीबद्दलबी भाष्य केले आहे.

त्यांच्या दाव्यानुसार 1986 साली जन्मलेल्या खेळाडू किंवा कर्णधारानंतर 1987 साली जन्मलेल्या खेळाडूने किंवा जबाबदारी घेतलेल्या कर्णधाराने नजीकच्या काळात यश मिळवले आहे.

लोबो यांनी सांगितल्यानुसार टेनिसमध्ये 1987 साली जन्मलेल्या नोवाक जोकोविचने 1986 साली जन्मलेल्या राफेल नदालला मागे टाकले आहे.

तसेच 2018 साली ह्युगो लॉरिसच्या नेतृत्वातील फ्रान्स संघाने फिफा वर्ल्डकप जिंकला होता. ह्युगोचा जन्म 1986 साली झाला आहे. तसेच त्यानंतर 2022 मध्ये 1987 साली जन्मलेल्या लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेटिनाने फिफा वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले.

तसेच 2019 साली इंग्लंडने ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. मॉर्गनचे जन्मसाल 1986 आहे. त्यामुळे यंदा 1987 साली जन्मलेला कर्णधार 2023 वर्ल्डकप जिंकू शकतो.

दरम्यान, 2023 मध्ये कर्णधारपद सांभाळणाऱ्या खेळाडूंपैकी रोहित शर्मा आणि शाकिब अल हसन हे दोनच कर्णधार आहेत, ज्यांचे जन्मसाल 1987 आहे. शाकिब अल हसनचा जन्म 24 मार्च 1987 रोजी झाला आहे, तर रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी झाला आहे.

याबद्दल लोबो यांनी दावा केला आहे की शाकिब अल हसन देखील 1987 साली जन्मला आहे, पण बांगलादेश संघ तेवढा भक्कम संघ नाही. त्यामुळे त्याव्यतिरिक्त एकमेव कर्णधार हा रोहित शर्मा आहे. तो वर्ल्डकप जिंकेल.

दरम्यान, आता लोबो यांनी केलेला दावा खरा ठरणार का, हे चाहत्यांना 19 नोव्हेंबर रोजी वर्ल्डकप संपल्यानंतरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT