Quinton de Kock Dainik Gomantak
क्रीडा

SA vs WI: 43 चेंडूत डी कॉकने ठोकले शतक, 'या' दिग्गजांना सोडले मागे

SA vs WI: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे.

Manish Jadhav

SA vs WI: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 259 धावांचे लक्ष्य आहे.

संघासाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने शतक ठोकून आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेसाठी डी कॉकने झळकावलेले हे सर्वात जलद दुसरे शतक आहे.

क्विंटन डी कॉकने 43 चेंडूत इतिहास रचला

क्विंटन डी कॉकने वेस्ट इंडिजविरुद्ध 43 चेंडूत झंझावाती शतक झळकावले. T20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दुसरा खेळाडू ठरला आहे.

त्याने फाफ डु प्लेसिस, रिचर्ड लेव्ही यांच्यासह रिले रुसोला मागे सोडले आहे. या फॉरमॅटमध्ये डेव्हिड मिलर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने केवळ 35 चेंडूत टी-20 मध्ये शतक पूर्ण केले आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे पाच खेळाडू

डेव्हिड मिलर (35 चेंडू)

क्विंटन डी कॉक (43 चेंडू)

रिचर्ड लेव्ही (45 चेंडू)

फाफ डू प्लेसिस (बॉल 46)

रिले रुसो (बॉल 46)

क्विंटन डी कॉकने 100 धावा केल्या

क्विंटन डी कॉक 100 धावा करुन बाद झाला. त्याने 44 चेंडूंचा सामना करत 100 धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. शेवटी Reifer ने त्याची शिकार केली.

या सामन्यात क्विंटन डी कॉकने स्वतःचाच विक्रम मोडला

या सामन्यात क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी टी-20 मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने स्वतःला मागे टाकले. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकले, त्याआधी त्याने 2020 साली इंग्लंडविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT