Saurashtra Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy: उनाडकटच्या सौराष्ट्रने दुसऱ्यांदा उंचावले विजेतेपद, फायनलमध्ये बंगाल पराभूत

Pranali Kodre

Saurashtra Won Ranji Trophy 2022-23: रविवारी सौराष्ट्र संघाने जयदेव उनाकटच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान झालेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 च्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने बंगाल संघाला 9 विकेट्सने पराभूत केले आणि विजेतेपदाला गवसणी घातली.

सौराष्ट्रने यापूर्वी 2019-20 हंगामातील रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. त्यावेळीही सौराष्ट्रने उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळतानाच हा कारनामा केला होता. विशेष म्हणजे 2019-20 रणजी हंगामातही सौराष्ट्रने बंगाललाच नमवत विजेतेपदावर पहिल्यांदा नाव कोरले होते.

दरम्यान रणजी ट्रॉफी 2022-23 च्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रासाठी कर्णधार उनाडकटची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 6 अशा मिळून 9 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो या सामन्यातील सामनावीरही ठरला.

महत्त्वाचे म्हणजे उनाडकटला या अंतिम सामन्यासाठी सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातून मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे त्याला रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळता आला.

उनाडकटने सामन्यानंतर म्हटले की 'विजेतेपद एका सामन्याने मिळत नाही. हा दीर्घ हंगाम होता. आम्ही खूप मेहनत घेतली. यापूर्वी विजय हजारे ट्रॉफी जिंकली. संघातील खेळाडूंमध्ये सातत्य आहे. जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा सर्वजण पुढे येतात. ही गोष्ट केवळ काही एक-दोन खेळाडूंबद्दल नाही, तर संघाबद्दल आहे. आम्ही जिथे गरज होती, त्या विभागांवर काम केले. मला सौराष्ट्र संघासाठी खेळायला आवडते. हा संघ माझ्या हृदयाच्या जवळ आहे.'

असा झाला अंतिम सामना

या सामन्यात बंगालचा संघ पहिल्या डावात 54.1 षटकात 174 धावांवर धावांवर सर्वबाद झाला होता. बंगालकडून शहाबाज अहमद (69) आणि यष्टीरक्षक अभिषेक पोरेल (50) यांनी अर्धशतके केली होती. तसेच सौराष्ट्रकडून उनाडकट व्यतिरिक्त या डावात चेतन साकारियानेही 3 विकेट्स घेतल्या.

तसेच सौराष्ट्रने पहिल्या डावात 110 षटकात तब्बल 404 धावा धावफलकावर लावल्या. त्यामुळे सौराष्ट्रने 230 धावांची आघाडी मिळवली. सौराष्ट्रकडून हार्विक देसाई (50), शेल्डन जॅक्सन (59), अर्पित वसवडा (81) आणि चिराग जानी (60) यांनी अर्धशतके झळकावली. बंगालकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आकाश दीप आणि इशान पोरेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या बंगालला 70.4 षटकात 241 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना सौराष्ट्रसमोर अगदी सोपे 12 धावांचे आव्हानच उभे करता आले. या डावात बंगालकडून अनुस्तुप मुजुमदार (61) आणि कर्णधार मनोज तिवारी (68) यांनी अर्धशतके केली. पण बाकी कोणाला फार काही करता आले नाही. या डावात सौराष्ट्रकडून उनाडकटने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच साकारियाने 3 विकेट्स घेतल्या.

सौराष्ट्रने चौथ्या दिवशी 12 धावांचे आव्हान तिसऱ्या षटकातच 1 विकेट गमावत पूर्ण केले. सौराष्ट्रने जय गोहिलची शुन्यावर विकेट गमावली. पण हार्विक देसाई (4*) आणि विश्वराज जडेजाने (10*) सौराष्ट्रला विजय मिळवून दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

SCROLL FOR NEXT