Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty | Mohammed Shami 
क्रीडा

Sports Awards: सात्विक-चिरागची खेलरत्नसाठी, तर शमीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, पाहा नामांकीत खेळाडूंची लिस्ट

National Sports Awards: भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची अर्जुन पुरस्कारासाठी आणि बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty nominated for Khel Ratna Mohammed Shami for Arjun Award:

क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी भारत सरकारकडून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार हे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. आता यंदाच्या पुरस्कारांसाठी अनेक खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षापासून बॅडमिंटन कोर्ट गाजवणारी पुरुष दुहेरीतील जोडी सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना खेलरत्न या भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकांचाही समावेश आहे.

दरम्यान, यापूर्वी पुलेला गोपिचंद, सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू या बॅडमिंटनपटूंना हा पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे जर सात्विक आणि चिरागलाही हा पुरस्कार मिळाला, तर त्यांचे नावही या यादीत जोडले जाईल.

याशिवाय भारतात झालेल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने सर्वांकडून वाहवा मिळवलेल्या मोहम्मद शमीच्या नावाची बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी विशेष शिफारस केली आहे.

शमीने या स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 3 सामन्यात पाच विकेट्स घेण्याचाही कारनामा केलेला. त्याने नाव आधी या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंमध्ये नव्हते, पण नंतर त्याचे नाव सामील करण्यात आले. त्याच्याव्यतिरिक्त एकूण 16 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेले खेळाडू

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी

अर्जुन पुरस्कार: मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (अंध क्रिकेट) ओजस प्रवीण देवतळे, अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि एम. श्रीशंकर (ऍथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाला (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (नेमबाजी), अंतीम पंघल (कुस्ती) आणि अहिका मुखर्जी (टेबल टेनिस).

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार: कविता (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन) आणि विनीत कुमार शर्मा (हॉकी).

द्रोणाचार्य पुरस्कार: गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आर.बी. रमेश (बुद्धिबळ) आणि शिवेंद्र सिंग (हॉकी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT