World Cup 2023: फायनलनंतर कोणाला मिळाला सामनावीर अन् मालिकावीर पुरस्कार? घ्या जाणून

Man of the Series: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या फायनलनंतर सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार जिंकलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घ्या.
India vs Australia | World Cup 2023 Final
India vs Australia | World Cup 2023 Final
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final, Man of the Match and Man of the Series:

रविवारी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने पराभूत करत विश्वविजेतेपदावर हक्क सांगितला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह तब्बल सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे.

सामनावीर पुरस्कार

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात सलामीवीर फलंदाज ट्रेविस हेडचे योगदान महत्त्वाचे राहिले. त्याने आधी शानदार क्षेत्ररक्षण केले, तसेच गोलंदाजी करताना 2 षटकात केवळ 4 धावा दिल्या.

तसेच नंतर भारताने दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४७ धावात ३ विकेट्स गमावल्यानंतर त्याने अफलातून फलंदाजी करत शतक साजरे केले आणि संघाला विजयापर्यंत पोहचवले.  त्याने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकार खेचत 137 धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

India vs Australia | World Cup 2023 Final
World Cup 2023: कोहलीचा 'विराट' कारनामा! फायनलमध्ये फिफ्टी ठोकत 'हा' विक्रम करणारा बनला पहिलाच क्रिकेटर

विशेष म्हणजे हेडने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळतानाही अर्धशतकी खेळी केली होती आणि २ विकेट्सही घेतल्या होत्या. त्यामुळे त्या सामन्यातही तो सामनावीर ठरला होता.

मालिकावीर पुरस्कार

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्व 11 सामन्यात शानदार खेळ करत मालिकावीर पुरस्कार विराट कोहलीने पटकावला. भारताचा स्टार फलंदाज असलेल्या विराटने यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करताना अनेक विक्रमही नावावर केले.

विराटने वर्ल्डकप 2023 मध्ये 11 सामन्यांत 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तो वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात एका स्पर्धेत 750 पेक्षा अधिक धावा करणारा पहिलाच खेळाडू देखील आहे.

India vs Australia | World Cup 2023 Final
World Cup 2023: ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा कोरलं वर्ल्डकपवर नाव! पाहा आत्तापर्यंतचे सर्व विजेते अन् उपविजेते संघ

भारताचे स्वप्न भंगले

भारतीय संघाने 2011 नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात यश मिळवले होते. पण भारताला वर्ल्डकप जिंकण्यात मात्र अपयश आहे. भारताने यापूर्वी 1983, 2003 आणि 2011 या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

मात्र, त्यातील 1983 आणि 2011 सालीच भारताला वर्ल्डकप जिंकता आला. २००३ सालीही भारताला अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. विशेष म्हणजे २००३ मध्येही भारताचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com