Team India PTI
क्रीडा

IND vs ENG: सर्फराज-कुलदीप घेणार केएल राहुल-जडेजाची जागा? दुसऱ्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची 'प्लेइंग-11'

India vs England, 2nd Test: इंग्लंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमला 2 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

India's Probable Playing 11 for 2nd Test against England:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला २ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी भारतीय संघाला काही मोठे धक्के बसले आहेत.

विशाखापट्टणमला होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून रविंद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोन खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. हे दोघेही हैदाराबादला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होते. मात्र, आता ते संघाबाहेर झाले असल्याने त्यांच्या जागेवर दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी दिली जाणार हा मोठा प्रश्न आहे.

दरम्यान, विराट कोहलीही संघातून बाहेर आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघात नव्याने रजत पाटीदार, सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी सलामीला कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच फॉर्मशी झगडणाऱ्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरवरील विश्वासही कायम केला जाऊ शकतो. दरम्यान, केएल राहुलच्या जागेवर रजत पाटीदार किंवा सर्फराज खानला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

याबद्दल भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही भाष्य केले असून त्यांनी म्हटले आहे की त्या दोघांपैकी एकाची निवड करणे कठीण आहे. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे.

त्याचबरोबर त्यांनी सांगितले की परिस्थिती आणि खेळपट्टी पाहून प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबत अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा घेईल.

याशिवाय केएस भरत यालाच यष्टीरक्षक म्हणून कायम केले जाईल. कारण तसेच राठोड यांनी सांगितले की खेळपट्टीबद्दल अंदाज बांधणे कठीण आहे. ही खेळपट्टी फिरकीला पोषक असू शकते, पण कदाचित पहिल्या दिवसापासून फिरकीला मदत करणार नाही, मात्र ती नंतर मदत करेल. सध्या तर अशीच खेळपट्टी दिसत आहे.'

हे पाहाता भारतीय संघ व्यवस्थापन जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम करू शकतात. जेणेकरून जरी सुरुवातीला फिरकी गोलंदाजांना मदत मिळाली नाही, तरी वेगवान गोलंदाज योगदान देऊ शकतील.

त्याचबरोबर जडेजा बाहेर गेल्याने आता चायनामन कुलदीप यादवलाच प्लेइंग इलेव्हनमध्ये पसंती दिली जाण्याची शक्यता दाट आहे. भारताकडे वॉशिंग्टन सुंदरचाही पर्याय फिरकी गोलंदाजीसाठी आहे. तो फलंदाजी देखील करू शकतो.

मात्र, खेळपट्टीचा विचार करता अक्षर पटेल आणि आर अश्विन या फिरकी गोलंदाजांसह तिसरा पूर्णवेळ फिरकी गोलंदाजी करू शकणारा गोलंदाज म्हणून कुलदीपलाच संधी दिली जाण्याची शक्यता दाट आहे.

परंतु, जर भारताला फलंदाजीतील खोली वाढवायची असेल, तर सौरभ कुमारचाही विचार केला जाऊ शकतो. तो डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सर्फराज खान/रजत पाटीदार, केएस भरत, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT