Sarfaraz & Musheer Khan X
क्रीडा

Sarfaraz & Musheer Khan: सर्फराजपाठोपाठ भाऊ मुशीरही गाजवतोय मैदान! दोन्ही भावंडांनी एकाच दिवशी ठोकली भारतासाठी शतकं

Sarfaraz & Musheer Khan: गुरुवारी सर्फराज खान आणि मुशीर खान या दोन भावंडांनी खणखणीत शतके ठोकली.

Pranali Kodre

Sarfaraz and Musheer Khan hits century for India A and U19 Team India respectively on same day:

क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक भावांच्या जोड्या होऊन गेल्या आहेत, ज्यांनी मैदान गाजवले. आता अशीच भारतातील एक भावांची जोडी क्रिकेटची मैदानं गाजवत आहे, ही जोडी म्हणजे सर्फराज खान आणि मुशीर खान.

सध्या सर्फराज खान भारत अ संघाकडून अहमदाबादमध्ये इंग्लंड अ संघाविरुद्ध चालू असलेल्या चार दिवसीय सामन्यात खेळत आहे, तसेच मुशीर दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत खेळत आहे.

दरम्यान, या दोघांनीही गुरुवारी (25 जानेवारी) आपापल्या भारतीय संघासाठी शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सर्फराजचे शतक

सर्फराज गेल्या काही वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत आहे. अशातच आता त्याने भारतीय अ संघाकडूनही शतकी खेळी केली आहे. 24 जानेवारीपासून सुरु झालेल्या चार दिवसीय सामन्यात इंग्लंड अ संघाचा पहिला डाव 152 धावांवर संपुष्टात आला होता.

त्यानंतर भारतीय अ संघा फलंदाजीला उतरला. भारतीय अ संघाकडून गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्फराजने आक्रमक फलंदाजी करत दीडशतकी खेळी केली. त्याने १६० चेंडूत 161 धावा केल्या. या खेळीत त्याने 18 चौकार आणि 5 षटकार मारले.

तसेच या सामन्यात देवदत्त पडिक्कलनेही 105 धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (58), वॉशिंग्टन सुंदर (57) आणि सौरभ कुमार (77) यांनी अर्धशतके केली. भारतीय संघ 111.1 षटकात 489 धावांवर सर्वबाद झाला.

मुशीर सामनावीर

दरम्यान, सर्फराजच्या शतकानंतर गुरुवारीच 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून आयर्लंडविरुद्ध खेळतान मुशीरने कर्णधार उदय सहारनबरोबर (75) दीडशतकी भागीदारी केली.

दरम्यान, त्याने त्याचे शतकही पूर्ण केले. या सामन्यात त्याने 106 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 118 धावांची खेळी केली. त्यामुळे 19 वर्षांखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 301 धावा केल्या.

त्यानंतर 302 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंड संघ 100 धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 201 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार मुशीरला देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT