Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Sanju Samson 1000 T20 Runs As Opener: भारतीय संघाचा आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन अखेर आपल्या जुन्या रौद्र रुपात परतला.

Manish Jadhav

Sanju Samson 1000 T20 Runs As Opener: भारतीय संघाचा आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन अखेर आपल्या जुन्या रौद्र रुपात परतला. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सलामीला येत संजूने अवघ्या 20 चेंडूंत आपले वादळी अर्धशतक ठोकत टीकाकारांची बोलती बंद केली. या सामन्यात त्याने 22 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 57 धावांची विस्फोटक खेळी खेळली.

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात आणि 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' ठरल्यानंतर संजू खराब फॉर्मशी झुंजत होता. गेल्या पाच डावांत त्याला 30 धावांचा टप्पाही ओलांडता आला नव्हता; मात्र या धुवांधार खेळीने त्याने फॉर्ममध्ये परतल्याचे स्पष्ट संकेत दिले.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या विस्फोटक अर्धशतकासोबतच संजू सॅमसनने (Sanju Samson) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून एक मोठा टप्पा पार केला. भारतीय संघासाठी ओपनिंग करताना त्याने 1000 पेक्षा जास्त धावा पूर्ण केल्या असून भारताच्या टॉप-5 सलामीवीरांच्या खास क्लबमध्ये सामील झाला. या यादीत 3750 धावांसह माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे, तर केएल राहुल (1826 धावा), शिखर धवन (1759 धावा) आणि अभिषेक शर्मा (1726 धावा) यांच्यानंतर आता 1026 धावांसह संजू सॅमसनने या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने अफगाणिस्तानवर 7 गडी राखून एकतर्फी विजय मिळवत मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 बाद 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरा दाखल भारताने 160 धावांचे लक्ष्य अवघ्या 14.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा (19 चेंडूंत 38 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 6 षटकांत 88 धावांची तुफानी भागीदारी करुन पाया रचला. त्यानंतर इशान किशनच्या नाबाद 38 आणि तिलक वर्माच्या नाबाद 15 धावांच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक 3 बळी कर्णधार राशिद खानने घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT