Ravichandran Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: टीम इंडियाला स्पिनर नाही तर गेम चेंजर स्पिनर हवा...

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या दमदार खेळीमागे फिरकीपटूंना खलनायक म्हटले होते.

दैनिक गोमन्तक

भारताने दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिका गमावली. यावरुन टीम इंडियाच्या कामगिरीवर टीका होत आहे. खेळाडूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पराभवाचे कारण खुल्या पुस्तकासारखे झाले आहे, जे प्रत्येकजण वाचत आहे. परंतु टीम इंडियाच्या एका माजी सलामीवीराने टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आम्ही संजय मांजरेकर यांच्याबद्दल बोलतोय, ज्यांनी दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या दमदार खेळीमागे फिरकीपटूंना खलनायक म्हटले होते. (Sanjay Manjrekar Said Team India Needs Not Only Spinners But Also Game-Changer Spinners)

जयंत आणि जडेजाही चालणार नाहीत

अशा परिस्थितीत, जेव्हा ESPNCricinfo ने संजय मांजरेकर यांच्याशी मालिका पराभवाची चर्चा केली तेव्हा त्यांनी भारतीय फिरकीपटूंवर दोषारोप केला. मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाले, “टीम इंडियाला केवळ फिरकीपटूच नव्हे तर गेम चेंजर स्पिनर्सची गरज आहे, जे मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेऊन सामना जिंकण्यासाठी मदत करतील. या भूमिकेत चहल कितपत बसतो हे पाहावे लागेल. मला वाटत नाही की, जयंत यादव किंवा अगदी रवींद्र जडेजा सारखे काही काम करतील."

भारताने कुलदीप यादवला परत आणावे

मांजरेकर पुढे म्हणाले, भारताने कुलदीप यादवकडे पाहण्याची वेळ आली आहे. भारताला अशा विकेट्स फक्त रिस्ट स्पिनर्सच देऊ शकतात. कारण तो मधल्या षटकांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज आहे.

कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 11 ते 40 षटकांमध्ये एकूण 68 विकेट घेतल्या आहेत, जे सर्वाधिक आहे. त्याच्या तुलनेत इंग्लंडचा आदिल रशीद 59 विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत युझवेंद्र चहल 50 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मांजरेकर म्हणाले की, स्पिनरने मधल्या ओव्हर्समध्ये 3-4 विकेट घेतल्यास बुमराहसारख्या फास्ट बॉलरचे काम डेथ ओव्हर्समध्ये सोपे होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

SCROLL FOR NEXT