Sania Mirza Dainik Gomantak
क्रीडा

Sania Mirza: पराभवाने सानिया मिर्झाची कारकीर्द संपली, टेनिसला केला अलविदा

WTA Dubai Duty Free Championships: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने काही वेळापूर्वीच आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली.

Manish Jadhav

WTA Dubai Duty Free Championships: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने काही वेळापूर्वीच आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. सानियाने अलीकडेच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचून आपला ग्रँडस्लॅम प्रवास संपवला.

सानिया शेवटच्या वेळी डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार होती. मात्र या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सानियाची कारकीर्द संपुष्टात आली आहे.

सानियाला तिच्या शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला

सानिया मिर्झाने (Sania Mirza) मंगळवारी WTA दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजबरोबर सरळ सेटमध्ये पराभूत होऊन तिची शानदार कारकीर्द संपवली.

तासभर चाललेल्या या सामन्यात सानिया आणि कीज यांना रशियाच्या वेरोनिका कुडरमेटोवा आणि ल्युडमिला सॅमसोनोव्हा यांच्याकडून 4-6, 0-6 असा पराभव पत्करावा लागला. वेरोनिका एकेरीमध्ये 11व्या आणि दुहेरीत पाचव्या क्रमांकावर आहे तर ल्युडमिला दुहेरीत 13व्या क्रमांकावर आहे.

2003 मध्ये करिअरला सुरुवात झाली

36 वर्षीय सानियाने तिच्या कारकिर्दीत 6 ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली, ज्यात महिला दुहेरीत तीन आणि मिश्र दुहेरीत मिळवली आहेत. महिला दुहेरीत तिने मार्टिना हिंगीससह तिची तिन्ही ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण नकोच! निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरणार'; स्थानिक आक्रमक

Atal Patrol Ship: खोल समुद्रात स्वदेशी 'अटल' घालणार गस्त! गोवा शिपयार्डतर्फे 6वे द्रुतगती जहाज; आणखी 12 जहाजांचे जलावतरण होणार

Goa Job Scam: 20 लाख घेतात, अमेरिकेत नोकरीचे आश्वासन देतात; गोव्यातील तरुणांची होतेय फसवणूक, आमोणकरांनी मांडली व्यथा

Goa University: ‘चोरीचा अहवाल फुटला कसा?’ विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या बैठकीत 4 तास खल

SCROLL FOR NEXT