Shoaib Malik & Izhaan Mirza Malik Dainik Gomantak
क्रीडा

Video: शोएब मलिक मुलासोबत बॅडमिंटन खेळताना दिसला, "क्रिकेट + टेनिस = बॅडमिंटन"

Sania Mirza Husband: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकने नुकताच मुलगा इझान मिर्झा मलिकसोबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे.

Manish Jadhav

Sania Mirza Husband: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकने नुकताच मुलगा इझान मिर्झा मलिकसोबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या मुलासोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शोएबने लिहिले की, "क्रिकेट + टेनिस = बॅडमिंटन".

दरम्यान, शोएब मलिकची (Shoaib Malik) पत्नी सानिया मिर्झा ही स्टार भारतीय टेनिसपटू होती. तिने अलीकडेच निवृत्ती जाहीर केली. तर शोएबने पाकिस्तानसाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, त्याने अनेक वेळा स्वबळावर पाकिस्तानला सामनेही जिंकून दिले आहेत.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा वेगळे झाले आहेत का?

सानिया मिर्झाच्या (Sania Mirza) काही इन्स्टाग्राम पोस्ट या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक नाही हे दर्शवत आहेत. याशिवाय, शोएब सानियाच्या रिटायमेंट पार्टीतही दिसला नव्हता.

अलीकडेच, सानियाने तिच्या कुटुंबासह उमराह केला. यादरम्यानही शोएब तिच्यासोबत दिसला नाही. या सर्व घटनांमुळे दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले.

दुसरीकडे, सना जावेदच्या आधी शोएब मलिकचे नाव आणखी एक पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसोबतही जोडले गेले आहे.

खरेतर, याची सुरुवात शोएब आणि आयशाच्या हॉट फोटोशूटने झाली होती. या दोघांच्या बोल्ड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर पकडला होता. मात्र, पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरने या वृत्तांचे खंडन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

SCROLL FOR NEXT