Sania Mirza-Shoeb Malik Divorce Dainik Gomantak
क्रीडा

Sania Mirza Shoaib Malik Divorce: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सानियाने शेअर केला फोटो

Sania Mirza Shoaib Malik Divorce: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने 12 एप्रिल 2010 रोजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले.

दैनिक गोमन्तक

Sania Mirza Shoaib Malik Divorce: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने 12 एप्रिल 2010 रोजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले. आता लग्नाला 12 वर्षे लोटल्यानंतर या पाकिस्तानी-भारतीय जोडप्याच्या नात्यात एवढी दरी आली आहे की, रिपोर्ट्सनुसार दोघेही घटस्फोट घेणार आहेत. सानिया आणि शोएब यांनी आतापर्यंत या बातम्यांना ना स्वीकारले आहे ना नाकारले आहे. या बातम्यांच्या दरम्यान, सानिया मिर्झाने तिची पहिली इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. सानियाने या पोस्टमध्ये काय लिहिले आहे किंवा काय दाखवले आहे ते जाणून घेऊया.

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सानियाने फोटो शेअर केला आहे

सानिया मिर्झाने (Sania Mirza) इंस्टाग्रामवर काय पोस्ट केले आहे, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. मात्र दोन्ही स्पोर्ट्स आयकॉन्सने याबद्दल काहीही सांगितले नाही. दुसरीकडे, सानियाच्या वडिलांनी फेसबुक पोस्ट करुन या बातमीला संबोधित केले असावे. गोपनीयतेची विनंती करताना सानियाच्या वडिलांनी सर्वांना विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. आता या बातम्यांदरम्यान सानियाची सोशल मीडिया (Social Media) पोस्टही व्हायरल होत आहे.

पोस्ट पाहून शोएब मलिकचा हेवा वाटेल!

तुमच्या माहितीसाठी, सानियाने तिच्या नात्याबद्दल काहीही सांगितलेले नाही, फक्त एक साधा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सानिया रस्त्याच्या मधोमध एकटी उभी आहे. एओ जॉगिंग करत आहे किंवा व्यायाम करुन परतत असल्याचे दिसत आहे. कॅप्शनमध्ये सानियाने फक्त दोन झाडांचे इमोजी टाकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Old Goa Crime: खाकीला कलंक! जुने गोवे लैंगिक शोषण प्रकरणी बाल हक्क आयोगाची गंभीर दखल, 3 दिवसांत मागितला अहवाल

Marriage Certificate: गोव्यात 'डेस्टिनेशन वेडिंग' करणाऱ्यांसाठी मोठी खूषखबर; आता राज्यातच मिळणार मॅरेज सर्टिफिकेट! CM सावंतांची घोषणा

Robbery Case: तोंड बांधून आले, चाकू-गोफणीचा धाक दाखवून लुटले! अखेर ‘पारधी गँग’ कळंगुट पोलिसांच्या ताब्यात; मध्य प्रदेशच्या जंगलात धाडसी कारवाई

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT