Goa Sports News Dainik Gomantak
क्रीडा

उत्तर विभागीय ब गट क्रिकेट स्पर्धेत सम्राट स्पोर्टस क्लबने पटकावले विजेतेपद

ब गट क्रिकेट अंतिम लढतीत ग्लोबल क्लबवर दोन विकेटने मात

Kishor Petkar

Goa Sports News : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) उत्तर विभागीय ब गट क्रिकेट स्पर्धेत सम्राट स्पोर्टस क्लबने विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी ग्लोबल स्पोर्टस क्लबला दोन विकेट राखून हरविले. सामना रविवारी पर्वरी येथील जीसीए (Goa Cricket Association) अकादमी मैदानावर झाला. (Goa Cricket Association Latest News)

ग्लोबल क्लबने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा केल्या. त्यांच्या पीटर फर्नांडिसने सर्वाधिक 40 धावा नोंदविल्या. सम्राट क्लबच्या गौरव नाईकने तीन, तर आपाली कळंगुटकर व साहिल आरोलकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना सम्राट क्लबची 7 बाद 129 अशी घसरगुंडी उडाली. मात्र तळात साहिल आरोलकर (31) व आपाली कळंगुटकर (नाबाद 27) यांनी टिच्चून फलंदाजी केल्यामुळे सम्राट क्लबला विजय नोंदविता आला. साहिल व आपाली यांनी आठव्या विकेटसाठी 40 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आपालीने आकाश नाईक (नाबाद 5) याच्यासमवेत नवव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी करून संघाला सामना एक षटक राखून जिंकून दिला.

संक्षिप्त धावफलक : ग्लोबल स्पोर्टस क्लब : 38.4 सर्वबाद सर्वबाद 187 (पीटर फर्नांडिस 40, नीतिश काळे 19, आशिष शिरोडकर 28, दत्ता नाईक 13, भिकाजी पेडणेकर 22, प्रवीण नाईक 24, आपाली कळंगुटकर 2-40, तेजस देसाई 1-16, साहिल आरोलकर 2-20, आकाश नाईक 1-10, गौरव नाईक 3-42, संतोष तुळसकर 1-28) पराभूत वि. सम्राट स्पोर्टस क्लब : 39 षटकांत 8 बाद 190 (अमित गावस 26, विनोद नाईक 10, संतोष तुळसकर 38, आशिष नाईक 13, साहिल आरोलकर 31, आपाली कळंगुटकर नाबाद 27, नीतिश काळे 3-40, आशिष शिरोडकर 2-43, रायन फर्नांडिस 2-26).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT