Sam Curran  Dainik Gomanak
क्रीडा

IPL Auction 2023: बापरे! सॅम करनच्या बोलीने घडवला इतिहास! 'या' संघाने दिले तब्बल 18.50 कोटी

सॅम करनला 18.50 कोटींची बोली लागली आहे.

Pranali Kodre

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन इंडियन प्रीमीयर लीग 2023 हंगामाच्या लिलावात सर्वाधिक मागणी असणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक असेल असे अंदाज अनेकांनी वर्तवले होते. हे अंदाज खरे ठरल्याचे लिलावात दिसले आहे.

शुक्रवारी कोची येथे झालेल्या आयपीएल 2023 लिलावात त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चांगली चूरस झाली. त्यानंतर पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांनीही त्याच्यासाठी बोली लावायला सुरुवात केली. पण अखेर पंजाब किंग्सने 18.50 कोटींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.

त्यामुळे सॅम करन हा आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमतीत विकला गेलेला खेळाडू ठरला आहे. त्याने याबाबतीत ख्रिस मॉरिसला मागे टाकले आहे. ख्रिस मॉरिस आयपीएल २०२१ आयपीएळ लिलावात 16.25 कोटी रुपयांना विकला गेला होता.

सॅम करन यापूर्वीही पंजाब किंग्सकडून खेळला आहे. त्याने 2019 आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून पदार्पण केले होते. या हंगामात त्याने हॅट्रिकही घेतली होती. त्यानंतर आयपीएल 2020 मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केले होते. तो चेन्नईकडून दोन हंगाम खेळला. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 32 सामने खेळले असून 337 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्स घेतल्या आहेत.

सॅम करन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता. तसेच तो या वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात तो सामनावीरही ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT