anjali tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

सचिनच्या पत्नी गोव्यातील मत्सोद्योगाच्या प्रेमात

सचिनची पत्नी अंजलीही पतीप्रमाणेच गोव्यातील मत्सोद्योगाने भारावली

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे मत्स्यप्रेम जगजाहीर आहे. अधूनमधून तो माशांवर यथेच्छ ताव मारण्यासाठी सहकुटुंब दक्षिण गोव्यात येतो. येथील खेकड्यांची चव न्यारी असल्याचे त्याने वेळोवेळी सांगितले आहे. सचिनची पत्नी अंजलीही पतीप्रमाणेच गोव्यातील मत्सोद्योगाने भारावली, तिने येथील पारंपरिक व्यावसायाचे मनमुराद कौतुक केले. (Sachin Tendulkar's wife falls in love with Goa fishing industry)

अंजली सध्या गोव्याच्या (goa) भेटीवर असून बाणावली येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. पहाटेच्या ‘मॉर्निंग वॉक’ वेळी बाणावली समुद्र (sea) किनारी रपेट मारत असता, अंजली हिच्या नजरेस गोव्यातील पारंपरिक वडिलोपार्जित मासेमारी दिसली आणि तिची पावले थबकली. राज्यातील तरुण ‘निज रापणकार’ तन्मयतेने पारंपरिक व्यवसायाचे जतन करत असल्याबद्दल त्यांना आनंदही झाला.

अभिमानास्पद कार्य

बाणावली समुद्र किनारी आलेल्या मासेमारी बोटीतून मासळी (Fish) उतरवली जात होती. ते पाहून अंजली रापणकारांकडे गेली आणि तिने सारी प्रक्रिया जाणून घेतली. विचारपूस करून रापणकारांना शाबासकी देताना, ‘तरूण मच्छिमारांनी त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सुरू ठेवल्याचे पाहून खूप अभिमान वाटतो,’ असे 54 वर्षीय अंजलीने सांगितले. या मच्छिमारांवर देवाची कृपा असल्याचेही तिने नमूद केल्याची माहिती स्थानिक मच्छिमार पेले फर्नांडिसने ‘गोमन्तक’ला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT