Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चौकार आणि षटकार मारताना दिसणार आहे. सचिन तेंडुलकरला 'क्रिकेटचा देव' म्हटले जाते. सचिनने त्याच्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 आणि कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर सर्व फॉरमॅटमध्ये 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
सचिन मैदानावर पुन्हा चौकार आणि षटकार मारणार
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. 24 फेब्रुवारी 2010 रोजी सचिनने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. 2013 मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International Cricket) अलविदा केला होता. यातच आता सचिन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांसाठी उतरणार आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व करणार
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 10 सप्टेंबर 2022 ते 1 ऑक्टोबर 2022 दरम्यान खेळल्या जाणार्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (Road Safety World Series) दुसऱ्या सत्रात गतविजेत्या इंडियन लिजेंड्सचे नेतृत्व करेल. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे सामने कानपूर, रायपूर, इंदूर आणि डेहराडूनमध्ये (Dehradun) खेळवले जातील. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा पहिला सामना कानपूरमध्ये होणार असून रायपूरमध्ये दोन सेमीफायनल आणि फायनल होणार आहेत.
या वाहिनीवर थेट प्रक्षेपण
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा आगामी सीझन कलर्स सिनेप्लेक्स, कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट आणि नव्याने लाँच झालेल्या स्पोर्ट्स 18 खेलवर प्रसारित केला जाईल, तर व्हूट आणि जिओवर डिजिटल स्ट्रीमिंग केले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.