Sachin Tendulkar | Team India Dainik Gomantak
क्रीडा

'IND vs PAK सामन्यासाठी आता...' अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरची पोस्ट व्हायरल

Pranali Kodre

Sachin Tendulkar said things sets for match against Pakistan after India's Win against Afghanistan in ICC Cricket World Cup 2023:

भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दिल्लीला झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया आल्या. यातील सचिन तेंडुलकरच्या पोस्टही लक्षवेधक ठरली.

सचिनने त्याच्या पोस्टमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहचे कौतुक केले असून आता भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सर्व गोष्टी जुळून आल्याचे म्हटले आहे.

बुधवारी अफगाणिस्तानने हश्मतुल्लाह शाहिदी (80) आणि अझमतुल्लाह उमरझाई (62) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 273 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग भारताने 35 षटकात 2 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. भारताकडून रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावांची खेळी केली. तसेच विराटने नाबाद 55 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या.

आता या सामन्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आपला तिसरा सामना पाकिस्तानविरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे.

याबद्दल सचिनने पोस्ट केली की 'बुमराह आणि रोहितकडून शानदार कामगिरी, त्यांना संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजी फळीने तेवढीच चांगली साथ दिली. पहिल्या दोन्ही सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंचे योगदान पाहायला मिळाले आणि त्यामुळे 14 ऑक्टोबरसाठी सर्व गोष्टी योग्य पद्धतीने जुळून आल्या आहेत. पुढच्या सामन्याची उत्सुकता आहे.'

रोहितने मोडला सचिनचा विक्रम

दरम्यान, रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध शतक करताना सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम मोडले आहेत. त्याने वनडे वर्ल्डकपमधील सातवे शतक झळकावले. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये 7 शतक करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला याबाबत मागे टाकले आहे. सचिनने वनडे वर्ल्डकपमध्ये 6 शतके केली आहेत.

तसेच रोहितने या खेळीदरम्यान वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडला. त्याने 19 डावात हा टप्पा पार केला. त्यामुळे त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा क्रिकेटपटू बनण्याच्या डेव्हिड वॉर्नरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. वॉर्नरनेही 19 डावातच वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या सचिन तेंडुलकर आणि एबी डिविलियर्स आहेत. या दोघांनीही प्रत्येकी 20 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT