Virat Kohli | India vs Australia | World Cup 2023 Final
Virat Kohli | India vs Australia | World Cup 2023 Final BCCI
क्रीडा

World Cup 2023: फायनलपूर्वी मास्टर-ब्लास्टरने शेवटच्या वनडेची खास आठवण किंग कोहलीला दिली गिफ्ट! पाहा फोटो

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 Final, India vs Australia, Sachin Tendulkar gifts Virat Kohli his signed jersey:

रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे.

दरम्यान, हा सामना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी सचिन तेंडुलकरने खूप खास बनवला आहे. या सामन्यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिनने विराटला खास गिफ्ट दिले आहे, ज्याबद्दल बीसीसीआयने फोटोही शेअर केले आहेत.

सचिनने विराटला त्याच्या अखेरच्या वनडे सामन्याची जर्सी स्वाक्षरी करून दिली आहे. तसेच त्या दोघांचे काही फोटोही दिले आहेत. सचिनने जर्सी गिफ्ट दिलेल्या फोटोंच्या पोस्टला

बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की 'खास सोहळ आणि सामन्यापूर्वीचे विशेष क्षण. दर्जेदार कृती. दिग्गज सचिन तेंडुलकरने विराटला त्याची अखेरच्या वनडेची जर्सी स्वाक्षरी करून भेट दिली आहे.

विराटने मोडला सचिनचा विक्रम

खरंतर विराटने काही दिवसांपूर्वीच म्हणजे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकले होते. त्यावेळी ते विराटचे वनडेतील 50 वे शतक होते. त्यामुळे विराटने सचिनचा 49 वनडे शतकांचा विक्रम मोडला होता.

विशेष म्हणजे हा सामना सचिनच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला होता आणि या सामन्यासाठी सचिन देखील उपस्थित होता. त्यावेळी विराट शतक ठोकल्यानंतर सचिनसमोर नतमस्तकही झाला होता.

एकत्र जिंकलेला वर्ल्डकप

उल्लेखनीय गोष्ट अशी की 12 वर्षांपूर्वी भारतीय संघाने जेव्हा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला होता आणि जिंकला होता, त्यावेळी सचिन आणि विराट एकत्र खेळले होते. तसेच भारताने श्रीलंकेला पराभूत करत विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर विराटने सचिनला खांद्यावर घेत वानखेडेची चक्करही मारली होती.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक

दरम्यान, रविवारी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.

अंतिम सामन्यासाठी अशी आहे प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), ऍडम झम्पा, जोश हेझलवुड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT