Sachin Tendulkar & Shoaib Akhtar  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: ‘सबकुछ ठंडा रखा…,’ मास्टर ब्लास्टरने विजयानंतर अख्तरला दिलं सडेतोड उत्तर

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघाची खूप खिल्ली उडवली जात आहे.

जिथे भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण आणि माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानींची चांगलीच मजा घेतली. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही शोएब अख्तरच्या एका पोस्टला उत्तर देत चांगलीच मजा घेतली.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) 13 ऑक्टोबर रोजी एक्स वर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने सचिन तेंडुलकरला बाद करतानाचा जुना फोटो शेअर केला होता.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, 'उद्या तुम्हाला असे काही करायचे असेल तर शांत राहा.' आता त्याच पोस्टला उत्तर देताना सचिन तेंडुलकरने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सचिनच्या उत्तराचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

सचिनचे समर्पक उत्तर

सचिनने शोएब अख्तरच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, 'माय फ्रेंड... तुझ्या सल्ल्याचे पालन केले आणि सर्वकाही पूर्णपणे थंड ठेवले.' सचिनच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

पहिल्या डावात पाकिस्तानने 6 विकेट्स गमावल्यानंतर शोएब अख्तरने यापूर्वी निराशा व्यक्त केली होती. पाकिस्तानच्या फलंदाजावर प्रतिक्रिया देताना त्याने आपली निराशा व्यक्त केली.

भारताचा सलग 8वा विजय

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा (Pakistan) हा 8वा विजय होता. विश्वचषकातील कोणत्याही संघाचा हा सर्वाधिक सलग विजय आहे. सलग 8 वेळा श्रीलंकेचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानच्या नावावर हा विक्रम आहे. आता टीम इंडियानेही या बाबतीत पाकिस्तानशी बरोबरी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

Anti Aircraft Missile System: कोणत्या देशांकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम; भारताचं काय स्टेटस?

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

SCROLL FOR NEXT