Team India Dainik Gomantak
क्रीडा

SA vs IND: केपटाऊनमध्ये भारतीय गोलंदाजांचा दबदबा, सिराज-मुकेश चमकले; भारताकडे 36 धावांची आघाडी

SA vs IND: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 55 धावा केल्या.

Manish Jadhav

South Africa vs India 2nd Test at Cape Town: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 55 धावा केल्या.

प्रत्युत्तरात भारताने 153 धावा केल्या आणि 98 धावांची आघाडी घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 62/3 झाली आहे. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 36 धावांची आघाडी आहे. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे.

दरम्यान, केपटाऊनमध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 62/3 आहे. एडन मार्करम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम सात धावांसह खेळत आहे. भारताकडे अजूनही 36 धावांची आघाडी असून दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात विकेट शिल्लक आहेत.

दुसऱ्या डावात भारताकडून मुकेश कुमारने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. डीन एल्गार 12 धावा करुन बाद झाला. टोनी डीजॉर्जी आणि ट्रिस्टन स्टब्स प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.

काइल व्हर्नने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय, एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्करम (12 धावा), डीन एल्गार (18 धावा), टोनी डीजॉर्जी (16 धावा), ट्रिस्टन स्टब्स (16 धावा), मार्को यान्सेन (0 धावा), केशव महाराज (1 धावा), कागिसो रबाडा (1 धावा), नांद्रे बर्गर बाद झाला (4 धावा).

दुसरीकडे, भारताचा पहिला डाव 153 धावांवर आटोपला. भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने 39 धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने 36 आणि विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने आठ धावा केल्या.

यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार यांना खाते उघडता आले नाही. मात्र, मुकेशला एकाही चेंडूचा सामना करावा लागला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT