S Sreesanth Six to Andre Nel Dainik Gomantak
क्रीडा

S Sreesanth: श्रीसंतचा 'तो' जबरदस्त सिक्स अन् भन्नाट सेलिब्रेशन, ना चाहते विसरले, ना खेळाडू; Video

एस श्रीसंतने 17 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या आंद्रे निलविरुद्ध मारलेला षटकाराची आठवण आजही अनेक क्रिकेट चाहत्यांकडून काढली जाते.

Pranali Kodre

S Sreesanth: भारताचा क्रिकेटपटू एस श्रीसंत याची कारकिर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली आणि वादग्रस्त राहिली. पण असे असले तरी त्याच्या कारकिर्दीतील काही घटनांनी क्रिकेट चाहत्यांच्या मनात सुखद आठवणी निर्माण केल्या होत्या.

टी20 वर्ल्डकप 2007 फायनलमधील अखेरचा झेल, 2011 वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धची कामगिरी अशा काही या आठवणी आहेत. पण याबरोबरच त्याने 17 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध षटकार मारल्यानंतर केलेले सेलिब्रेशनही अनेकांना आजही आठवत असेल. काय आहे तो किस्सा जाणून घेऊ.

साल 2006 मध्ये भारतीय संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्याकाळी दक्षिण आफ्रिका संघात ग्रॅमी स्मिथ, हर्षेल गिब्ल, जॅक कॅलिस, एबी डिविलियर्स, मखया एन्टीनी, डेल स्टेन असे अनेक दिग्गज खेळाडू होते.

त्यामुळे भारतीय संघासमोर आव्हानही मोठे होते. अनेकांनी अंदाज वर्तवल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकलीही. मात्र, तरी भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकून अनेकांना आश्चर्यचकीत केले होते.

(S Sreesanth wild celebration after hitting South African pacer Andre Nel for a six)

याच जोहान्सबर्गला झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीसंतने मारलेला षटकार त्या सामन्यात खेळलेल्या सर्वांच्याच लक्षात राहिला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 249 धावा केल्या होत्या.

त्यानंतर फंलदाजीला उतरलेला दक्षिण आफ्रिका संघ आपल्याच घरच्या मैदानात पहिल्या डावात केवळ 84 धावांवर सर्वबाद झाला. श्रीसंत आणि झहिर खानच्या तिखट माऱ्याचा सामना दक्षिण आफ्रिकेला करणे कठीण गेले. श्रीसंतने तर 5 विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली होती.

पण या डावापासून दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आंद्रे निल आणि श्रीसंत यांच्यातील शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली होती. निलने श्रीसंतच्या गोलंदाजीवर एक षटकारही ठोकलेला.

पण नंतर त्याच्यातील वाद भारताच्या दुसऱ्या डावातही कायम राहिले. भारताने दक्षिण आफ्रिकेला 84 धावांवर सर्वबाद केल्याने तब्बल 165 धावांची आघाडी घेतली होती. तसेच दुसऱ्या डावातही भारताने सावध खेळ करत ही आघाडी 400 पर्यंत जाईल याची काळजी घेतली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू वैतागले होते.

याच दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 9 विकेट्स गमावल्या होत्या. अखेरची विकेट बाकी होती. यावेळी आंद्र निलने श्रीसंतला स्लेज करण्यास सुरुवात केली. तो तुझ्यात हिंमत नाही, अशा प्रकारचे वाक्य बोलून डिवचण्याचा प्रयत्न करत होता.

त्यावेळी श्रीसंतनेही त्याला सडेतोड उत्तर देताना त्याने गोलंदाजी केलेल्या 64 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याच्या डोक्यावरून खणखणीत षटकार खेचला होता. त्यानंतर श्रीसंतने घोडेस्वारी करण्याची ऍक्शन करत जोरदार सेलिब्रेशन केले होते. त्याचा हा षटकार आणि सेलिब्रेशनची चर्चा पुढे अनेकवर्षे झाली.

भारताने हा सामना 123 धावांनी जिंकला. श्रीसंतने दुसऱ्या डावातही 3 विकेट्स घेत, या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. तरी हा सामना श्रीसंतच्या त्या षटकारासाठी नेहमीच लक्षात ठेवला गेला.

अगदी एकदा डेल स्टेनने श्रीसंतच्या या षटकाराबद्दल बोलताना ऐतिहासिक म्हटले होते.

दरम्यान, या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकत मालिका नावावर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT