IND vs SA: यजुवेंद्र चहलने अम्पायरला मारली लाथ, VIDEO पाहून तुम्ही म्हणाल...

India vs South Africa ICC T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभव केला.
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalDainik Gomantak
Published on
Updated on

India vs South Africa ICC T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाचे स्टार फलंदाज प्लॉप ठरले. याच कारणामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामना सहजरित्या जिंकला. या सामन्यात यजुवेंद्र चहलला स्थान मिळाले नाही. पण तरीही त्याचा मैदानावर अम्पायरसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चहलने अम्पायरला लाथ मारली

कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) प्लेइंग इलेव्हनमध्ये यजुवेंद्र चहलचा समावेश केला नाही. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली. पण सामन्याच्या मधल्या ब्रेकदरम्यान तो अम्पायरसोबत मस्ती करताना दिसला. त्याने मजेशीर पद्धतीने अम्पायरला लाथ मारली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yuzvendra Chahal
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल खेळणार नाही! या फलंदाजाला रोहित देणार संधी

T20 विश्वचषकात अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही

युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण त्याने टीम इंडियासाठी (Team India) अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. जेव्हा तो आपल्या लयीत असतो, तेव्हा तो कोणत्याही फलंदाजीच्या आक्रमणाला फाटा देऊ शकतो. चहलने भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये 85 विकेट घेतल्या आहेत.

Yuzvendra Chahal
IND vs SA 3st ODI: भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट

जेतेपदाचा प्रबळ दावेदार

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये एकमेव विजेतेपद पटकावले होते. तेव्हापासून टीम इंडिया या ट्रॉफीपासून दूर आहे. सध्याच्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने तीन सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com