Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Record: कोहलीचा डंका! सातवी IPL सेंच्यूरी ठोकत विक्रमांचा पाडला पाऊस, एकदा नजर टाकाच

Pranali Kodre

Virat Kohli Century Record: रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यात बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतकी खेळी केली.

विराटने या सामन्यात 61 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी करताना 13 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटचे हे आयपीएल 2023 मधील सलग दुसरे शतक ठरले आहे. त्याचबरोबर आयपीएल कारकिर्दीतील सातवे शतक ठरले आहे.

त्यामुळे विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ख्रिस गेलच्या 6 आयपीएल शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. सर्वाधिक आयपीएल शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आणि ख्रिस गेलच्या पाठोपाठ 5 शतकांसह जॉस बटलर आहे.

सलग दुसरे शतक

विराटने आयपीएल 2023 मध्ये 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध देखील 100 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याने आता गुजरातविरुद्धही शतक केले आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सलग दोन शतके करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी 2020 आयपीएलमध्ये शिखर धवनने आणि 2022 आयपीएलमध्ये जॉस बटलरने सलग दोन शतके केली होती. शिखरने दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना आणि बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना असा कारनामा केलेला.

आयपीएल 2023 मध्ये 600 धावा

विराटने या शतकासह आयपीएल 2023 मध्ये 600 धावांचा टप्पाही पार केला आहे. आयपीएल हंगामात 600 धावांचा टप्पा पार करण्याची ही विराटची तिसरी वेळ आहे. विराटने 2023 पूर्वी 2013 आणि 2016 आयपीएल हंगामात 600 धावांचा टप्पा पार केला होता.

त्यामुळे आयपीएलमध्ये तीन किंवा अधिक हंगामात 600 धावांचा टप्पा पार करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटचा समावेश झाला आहे.

सर्वाधिक आयपीएल हंगामात 600 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने 2018, 2020, 2021 आणि 2022 या चार आयपीएल हंगामात 600 धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच विराट व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल यांनीही प्रत्येकी 3 आयपीएल हंगामात 600 धावांचा टप्पा पार केला आहे.

वॉर्नरने 2016, 2017 आणि 2019 आयपीएल हंगामात 600 हून अधिक धावा केलेल्या. गेलने 2011, 2012 आणि 2013 आयपीएल हंगमांमध्ये 600 पेक्षा जास्त धावा केलेल्या. तसेच फाफ डू प्लेसिसने आयपीएल हंगामात दोन वेळा 600 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने 2021 आणि 2023 हंगामात 600 धावांचा टप्पा पार केला आहे.

टी20 मध्ये सर्वाधिक शतके

विराटचे रविवारी केलेले शतक एकूण टी20 क्रिकेट कारकिर्दीतील आठव शतक ठरले आहे. त्यामुळे त्याने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूंमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने या यादीत तिसऱ्या क्रमांकावरील मायकल क्लिंगर, डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच यांची बरोबरी केली आहे. या तिघांनीही 8 टी20 शतके केली आहेत.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूंमध्ये अव्वल क्रमांकावर 22 शतकांसह ख्रिस गेल आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर 9 शतकांसह बाबर आझम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT