Rotary Rain Run Dainik Gomantak
क्रीडा

Rotary Rain Run : मोहित, दक्षयानी अर्धमॅरेथॉनमध्ये अव्वल

10 किलोमीटरमध्ये प्रद्युम्न, अमृता प्रथम स्थानी

Kishor Petkar

पणजी : रोटरी रेन रनमध्ये कांग्रा (हिमाचल प्रदेश) येथील मोहित व म्हापसा येथील दक्षयानी मुरगोड यांनी 21 किलोमीटर अर्धमॅरेथनमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. शर्यत रविवारी बांबोळी येथे झाली.

पर्वरी येथील प्रद्युम्न नाईक व शिर्शी-कर्नाटक येथील शालेय विद्यार्थिनी अमृता जॉर्ज यांनी 10 किलोमीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला. रेन रन असली, तरी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या शर्यतीत धावपटूंना कोरड्या मार्गावरून धावता आले.

मुख्य अर्ध मॅरेथॉनला बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमवर पहाटे सुरवात झाली. मिरामार समुद्रकिनाऱ्यावरून पुन्हा अॅथलेटिक स्टेडियमवर शर्यत संपली. 10 किलोमीटर शर्यतीत धावपटूंनी अॅथलेटिक स्टेडियम ते ओडशेल नाका व परत गोवा विद्यापीठ येथून अॅथलेटिक स्टेडियम हा मार्ग कापला.

(Rotary Rain Run)

अर्धमॅरेथॉनमध्ये मोहित याने एक तास 31 मिनिटे 53 सेकंद वेळ नोंदविली, तर महिलांत दक्षयानी हिने दोन तास 17 मिनिटे 43 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. 10 किलोमीटर शर्यतीत प्रद्युम्नला अंतर पार करण्यासाठी 37.04 मिनिटे लागली. नवव्या इयत्तेतील विद्यार्थिनी असलेल्या अमृता हिने 52.57 मिनिटांत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

व्हेटरन गटातही चुरस

स्पर्धेत व्हेटरन गटातही चुरस दिसली. 45 वर्षे वयोगटातही 21 किलोमीटर अर्धमॅरेथॉन झाली. भारतीय नौदलाच्या सुबेसिंग यादव याने 1 तास 42.33 मिनिटांत, महिलांत मुंबईच्या क्रांती साळवी हिने 2 तास 00.18 मिनिटांत शर्यत पूर्ण केली.

व्हेटरन्स 10 किलोमीटर शर्यतीत फोंड्याचा नरेश कुमार (55.18 मिनिटे), तर म्हापशाची लीना कामत (1 तास 00.56 मिनिटे) हिने पहिला क्रमांक मिळविला.

कारकिर्दीतील पहिल्याच पोडियमचा आनंद

महिलांच्या 10 किलोमीटर शर्यतीत अव्वल ठरलेली अमृता जॉर्ज हिचे हे कारकिर्दीतील पहिलेच विजेतेपद ठरले. ''या विजयामुळे मी रोमांचित झाले आहे. प्रथमच मला पोडियमवर जागा मिळाली. या कामगिरीने मी प्रोत्साहित झाले असून यापुढे आणखी मेहनत घेण्याचे ध्येय आहे,'' असे अमृता म्हणाली.

सविस्तर निकाल

21 किलोमीटर पुरुष : मोहित (कांग्रा-हिमाचल, 1 तास 31.53 मिनिटे), योगेंद्र सिंग (नौदल-वास्को, 1 तास 38.51 मिनिटे), पांडुरंग बोडणे (बीड-महाराष्ट्र, 1 तास 38.52 मिनिटे).

21 किलोमीटर महिला : दक्षयानी मुरगोड (म्हापसा, 2 तास 17.43 मिनिटे), दुरैया लोखंडवाला (पणजी, 2 तास 22.10 मिनिटे), श्रद्धा तारकर (पणजी, 2 तास 24.14 मिनिटे).

21 किलोमीटर व्हेटरन पुरुष : सुबेसिंग यादव (भारतीय नौदल-वास्को, 1 तास 42.33 मिनिटे), मेल्विन फर्नांडिस (उत्तर गोवा, 1 तास 52.45 मिनिटे), दामोदर वेर्लेकर (कुडका, 1 तास 53.00 मिनिटे).

21 किलोमीटर व्हेटरन महिला : क्रांती साळवी (मुंबई, 2 तास 00.18 मिनिटे), फातिमा डिसा (पणजी, 2 तास 01.11 मिनिटे), चेन यालिंग (2 तास 03.13 मिनिटे).

10 किलोमीटर पुरुष : प्रद्युम्न नाईक (पर्वरी, 37.04 मिनिटे), आकाश आगरवाडेकर (पणजी, 38.16 मिनिटे), विनायक गावकर (वास्को, 40.38 मिनिटे).

10 किलोमीटर महिला : अमृता जॉर्ज (शिर्शी-कर्नाटक, 52.57 मिनिटे), क्लॅरिसा कॉस्ता (पणजी, 53.25 मिनिटे), लीना शेट्टी (पणजी, 55.11 मिनिटे).

10 किलोमीटर व्हेटरन पुरुष : नरेश कुमार (फोंडा, 55.18 मिनिटे), शरद वारीक (फोंडा, 56.37 मिनिटे), प्रणव नाईक (फोंडा, 56.49 मिनिटे).

10 किलोमीटर व्हेटरन महिला : लीना कामत (म्हापस, 1 तास 00.56 मिनिटे), अशिमा अरोरा (म्हापसा, 1 तास 09.53 मिनिटे), सुनिता सिंग (पणजी, 1 तास 16.36 मिनिटे).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT