Former New Zealand Batsman Ross Taylor: न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर सध्या त्याच्या 'रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट' या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. टेलरने या पुस्तकात असे काही खुलासे केले आहेत, ज्याने भारतीय संघातील आजी-माजी खेळाडूंना हादरे बसत आहे. माजी किवी फलंदाजाने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, 'आयपीएल 2011 दरम्यान राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) च्या मालकांपैकी एकाने मला थप्पड लगावली होती. थप्पड लगावण्यामागचे कारण म्हणजे मी पंजाब किंग्ज (Kings XI Punjab) विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झालो होतो.' या खुलाशानंतर आता टेलरने आणखी एक खुलासा केला आहे. यावेळी त्याने वीरेंद्र सेहवागबाबत नवा बॉम्ब फोडला आहे. मात्र, टेलरचा हा खुलासा सेहवागच्या फलंदाजीच्या टिप्सबाबत आहे.
दरम्यान, टेलर आणि सेहवाग आयपीएलच्या (IPL) 2012 च्या सीझनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (Now Delhi Capitals) चा भाग होते. त्यावेळी टेलर अनेक संकटाचा सामना करत होता. दिल्लीने टेलरला 1.3 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले होते. अशा स्थितीत त्याच्यावर फ्रँचायझीसाठी धावा करण्याचे दडपण होते.
दुसरीकडे, टेलरने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, "सेहवाग मैदानाभोवती शूटिंग करत असताना मी घाबरलो होतो. कारण दिल्लीने मला 1.3 दशलक्ष डॉलर्स देऊन विकत घेतले होते. माझ्या चेहऱ्यावर दबाव स्पष्ट दिसत होता. तेव्हा सेहवाग माझ्याकडे आला आणि त्याने मला धक्काबुक्की केली.''
खरेतर, या सामन्याच्या एक दिवस आधी टेलरने सेहवागसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन कोळंबीचा आस्वाद घेतला होता. टेलरने पुढे सांगितले की, 'सेहवागसह उर्वरित संघासोबत मी रेस्टॉरंटमध्ये होतो. कारण आमच्या संघामधील काही खेळाडूंना फुटबॉल आवडतो. हॉटेलमध्ये आम्ही एका मोठ्या स्क्रीनवर मँचेस्टर सिटीचा सामना पाहत होतो. तो सामना इंग्लिश प्रीमियर लीगचा (EPL) शेवटचा टप्पा होता, ज्यामध्ये सर्जियो अग्युरोने स्टॉपेज टाइममध्ये गोल केला. त्याचवेळी मँचेस्टर सिटीने (Manchester City) हा सामना 3-2 असा जिंकला आणि 44 वर्षांनंतर पहिले विजेतेपद पटकावले.' टेलरने आयपीएलमध्ये दिल्लीसाठी फक्त एकच हंगाम खेळला, त्याने 16 सामन्यांमध्ये 256 धावा केल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.