रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (English Premier League) दमदार कमबॅक केले. Dainik Gomantak
क्रीडा

Manchester United संघात रोनाल्डोचे धडाक्यात पुनरागमन, आईला अश्रू अनावर

मँचेस्टर युनाटेडकरुन (Manchester United) खेळताना पहिला गोल केल्यानंतर रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) आईला भावना अनावर झाल्या आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

दैनिक गोमन्तक

मँचेस्टर युनायटेड (Manchester United) संघात 12 वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या पोर्तुगलचा (Portugal) स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (English Premier League) दमदार कमबॅक केले असून, पहिल्याच सामन्यात 2 गोल करत मँचेस्टरला विजय मिळवून दिला. मँचेस्टरने हा सामना 4-1 अशा फरकाने जिंकला आहे.

क्रिस्टियानोने 2009 मध्ये मँचेस्टर युनाटेडला गुड बाय करत, स्पॅनिश क्लब रियाल मेड्रिडमध्ये सामिल झाला, त्यानंतर त्याने युरोपियन ट्रांसफर विंडोच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच्या अधिच्याच मँचेस्टर युनायटेडमध्ये आला आहे. या आधी रोनाल्डो इटलीच्या क्लब युबेटससाठी खेळत होता.

मँचेस्टर युनाटेडमधून पुन्हा खेळतानाचा काल त्याचा पहिला सामना होता. या सामन्यात त्याने दोन गोल करीत आपला जलवा दाखवून दिला आहे. रोनाल्डोने 45 साव्या मिनिटाला पहिला गोल करत मँचेस्टरला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये देखील रोनाल्डोने आपली जादू दाखवत 65 व्या मिनिटाला दुसरा गोल मँचेस्टला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलच्या आधी 56 व्या मिनिटाला न्युकास्टल संघाच्या जेवियर मॅक्यूलोने 56 व्या मिनिटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी केली होती. त्यानंतर 80 व्या मिनिटाला ब्रूनो आणि 90 व्या मिनिटाला जेसी लिंगार्ड यांनी अनुक्रमे दोन गोल केले आणि मँचेस्टर युनाटेडने 4-1 असा सामना जिंकला.

हा सामना पाहण्यासाठी रोनाल्डोची आई मैदानात उपस्थित होती. रोनाल्डोने बऱ्याच वर्षानंतर पुन्हा मँचेस्टर युनाटेडकरुन खेळताना पहिला गोल केल्यानंतर रोनाल्डोच्या आईला भावना अनावर झाल्या आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मँचेस्टरने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये आपल्या घरच्या मैदानावर सलग पाचवा सामना जिंकला आहे. मँचेस्टला घरच्या मैदानावर न्यूकास्टल संघाविरुध्द 27 सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात पराभावाचा सामना करावा लागला आहे. यात 18 सामने मँचेस्टरने जिंकले असून 8 सामने ड्रॉ झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT