Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022 मधून टीम इंडिया जवळपास बाहेर, ट्विटरवर #SackRohit झाला ट्रेंड

Asia Cup 2022: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आशिया कप 2022 मधून जवळपास बाहेर पडली आहे.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आशिया कप 2022 मधून जवळपास बाहेर पडली आहे. सुपर 4 सामन्यात भारताला आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन पराभवानंतर भारतीय संघाचा आशिया चषक स्पर्धेतील प्रवास जवळपास संपला आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाची एवढी वाईट अवस्था झाल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ट्विटरवर #SackRohit ट्रेंड झाला

सोशल मीडियावर चाहते रोहित शर्माला टार्गेट करत आहेत. आशिया कपमध्ये भारताच्या पराभवानंतर ट्विटरवर #SackRohit ट्रेंड करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्यांदाच सलग दोन टी-20 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 25.5K हून अधिक युजर्संनी ट्विटरवर #SackRohit ट्विट केले आहे. रोहित शर्माच्या खराब संघ निवडीमुळे तमाम क्रिकेट चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ प्रचंड संतापले आहेत.

रोहित गोंधळलेला दिसून आला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या आशिया कपमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रयोग केले आहे. रोहितने शानदार फिनिशर दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. यानंतर त्याने चांगली कामगिरी करुनही रवी बिश्नोईसारख्या घातक फिरकीपटूला बाहेर बसवले. याशिवाय, त्याने खराब कामगिरी करुनही केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: कुंकळ्ळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

SCROLL FOR NEXT