Rohit Sharma PTI
क्रीडा

IND vs AFG: कॅप्टन रोहितचा धोनीच्या वर्चस्वाला धक्का! भारताचा ठरला सर्वात यशस्वी T20I कर्णधार

Rohit Sharma: भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये मिळलेला विजय कर्णधार रोहित शर्मासाठी विश्वविक्रमी ठरला आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan 3rd T20I Match at Bengaluru, Rohit Sharma:

बुधवारी (17 जानेवारी) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेला तिसरा टी20 सामना अत्यंत रोमांचक झाला. या सामन्यात भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रमही झाला आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मिळवलेला हा 54 सामन्यांतील 42 वा विजय होता. त्यामुळे आता रोहित भारताचा सर्वात यशस्वी टी20 कर्णधार ठरला आहे. त्याने एमएस धोनीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

रोहित आता भारताकडून सर्वाधिक टी20 सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे. धोनीने 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत नेतृत्व करताना 41 विजय मिळवले आहेत.

तसेच रोहितने धोनीला मागे टाकण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळणाऱ्या एकूण कर्णधारांमध्ये असघर अफगाण, बाबर आझम, ब्रायन मसाबा आणि ओएन मॉर्गन यांची बरोबरी केली आहे. या चौघांनीही आंतराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून प्रत्येकी 42 विजय मिळवले आहेत.

आंतराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

  • 42 विजय - असघर अफगाण (52 सामने) (अफगाणिस्तान)

  • 42 विजय - बाबर आझम (71 सामने) (पाकिस्तान)

  • 42 विजय - ब्रायन मसाबा (54 सामने)(युगांडा)

  • 42 विजय - ओएन मॉर्गन (72 सामने) (इंग्लंड)

  • 42 विजय- रोहित शर्मा (54 सामने) (भारत)

  • 41 विजय - एमएस धोनी (72 सामने) (भारत)

  • 40 विजय - ऍरॉन फिंच (76 सामने) (ऑस्ट्रेलिया)

अफगाणिस्तानला व्हाइटवॉश

दरम्यान, भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली तिसरा टी20 सामना जिंकून अफगाणिस्तानला 3-0 असा व्हाइटवॉश दिला आहे. त्यामुळे  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाइटवॉश देण्याची ही सहावी वेळ होती. त्यामुळे तो सर्वाधिकवेळा टी20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाइटवॉश देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोनदा टी20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाइटवॉश दिला आहे. तसेच एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदा टी20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाइटवॉश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT