Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: हिटमॅनचे कर्णधारपद धोक्यात? 'हा' बनू शकतो टीम इंडियाचा नवा टी20 कर्णधार

रोहित शर्माला भारताचे टी20 कर्णधारपद सोडावे लागू शकते.

Pranali Kodre

Team India: भारतीय क्रिकेट संघाला पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. मायदेशात होणारी ही टी२० मालिका 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माला झालेल्या अंगठ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. रोहितला बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकावे लागले होते.

रोहितला गमवावे लागू शकते टी20 कर्णधारपद

दरम्यान, सध्या अशीही चर्चा आहे की लवकरच रोहितला भारताच्या टी20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागू शकते. त्याच्याऐवजी हार्दिक पंड्याला भारताच्या टी20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार केले जाऊ शकते. 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप होणार आहे. या दृष्टीने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

रोहितने 2021 टी20 वर्ल्डकपनंतर भारताच्या टी20 संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद स्विकारले होते. दरम्यान, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने द्विपक्षीय मालिका जिंकल्या, मात्र आशिया चषक आणि 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला विजेतेपदाला गवसणी घालण्यात अपयश आले.

आशिया चषकात भारताचे सुपर फोर फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते, तर 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये भारताला उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता.

हार्दिकला नेतृत्वाचा अनुभव

हार्दिकने आयपीएल 2022 स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना त्यांना विजेतेपदापर्यंत पोहचवले होते. तसेच त्याने रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना आयर्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत विजय मिळवला होता. त्याचा हा अनुभव पाहाता त्याचा भारताच्या टी20 संघाच्या नेतृत्वासाठी विचार होण्याची शक्यता दाट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT