Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: रोहित शर्माचा जर्सी नंबर 45 नसून 46 असायला हवा होता, असं का म्हणाले माजी आयपीएस?

Manish Jadhav

World Cup 2023: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 550 धावा झाल्या आहेत. रोहित प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला संघाला चांगली सुरुवात करुन देतो.

पहिल्याच चेंडूपासून रोहित विरोधी गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात करतो. संघाच्या विजयात कर्णधार रोहितची भूमिका महत्त्वाची आहे. दरम्यान, एका माजी आयपीएसने रोहित शर्माबद्दल सोशल मीडियावर एक मजेशीर प्रश्न विचारला आहे, ज्यावर लोक त्यांची उत्तरे देत आहेत.

माजी आयपीएसने रोहितच्या जर्सी क्रमांकावर प्रश्न विचारले

दरम्यान, एक्स वर एक पोस्ट शेअर करताना माजी आयपीएस आरके विज यांनी रोहित शर्माचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, रोहित शर्माचा जर्सी क्रमांक 4 आणि 6, 46 असायला हवा होता, का सांगा?

माजी आयपीएसच्या या पोस्टवर लोक खूप मजेशीर कमेंट करत आहेत. या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी लिहिले की, रोहित शर्मा (Rohit Sharma) चौकार आणि षटकारांनी डील करत असल्याने त्याचा जर्सी क्रमांक 45 नसून 46 असायला हवा होता. आणखी एका यूजरने लिहिले की, रोहित फक्त चौकार आणि षटकार मारतो.

फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार!

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आता चाहत्यांना पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माकडून वेगवान आणि मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) फायनलमध्ये धडक मारली आहे. आता रोहित त्याच्या नेतृत्वाखाली भारताला आणखी एक एकदिवसीय विश्वचषक जिंकून देऊ इच्छित आहे. याआधी भारतीय संघाने दोनदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT