IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. रोहीतने मोठी खेळी खेळताच विराट कोहलीला मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याबद्दल जाणून घेऊया.
रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुरुवातीपासूनच तो लयीत दिसला. त्याने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये 25 डाव खेळल्यानंतर त्याच्या बॅटमधून अर्धशतक झाले आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मोठी खेळी खेळताच तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) रोहित शर्माने 33 सामन्यांत 6 अर्धशतकांसह 31.44 च्या सरासरीने 970 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने 26 सामन्यात 925 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 792 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा - 970 धावा
विराट कोहली - 925 धावा
अजिंक्य रहाणे - 792 धावा
रॉबिन उथप्पा - 740 धावा
सुरेश रैना - 661 धावा
महेंद्रसिंग धोनी - 647 धावा
रोहितने आतापर्यंत 230 आयपीएल सामन्यांमध्ये 41 अर्धशतकांसह 5959 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 109 धावा आहे. त्याचवेळी, त्याचा स्ट्राइक रेट 130 आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.