<div class="paragraphs"><p>Rohit Sharma&nbsp;</p></div>

Rohit Sharma 

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Year End 2021: हिटमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत, भारतीय सलामीवीर रोहित शर्माने पहिल्या क्रमांक मिळवला आहे. रोहित शर्माने यावर्षी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 1420 धावा केल्या. यापैकी कसोटी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली, तर या वर्षात तो केवळ 3 एकदिवसीय सामने खेळला. त्याचबरोबर टी-20 सामन्यांमध्येही त्याची कामगिरी उत्तम होती.

2021 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहितची कामगिरी

रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) बोलायचे झाल्यास 2021 मध्ये त्याने भारतासाठी 11 टी-20 सामने खेळले असून यामध्ये त्याने 38.54 च्या सरासरीने 424 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या 74 धावा एवढी होती. दुसरीकडे, एकदिवसीय क्रिकेटचा विचार केल्यास, रोहित शर्माला 2021 मध्ये केवळ 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. या तीन सामन्यांमध्ये त्याने 30 च्या सरासरीने 90 धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 37 धावा होती.

यंदाच्या कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माने या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तो या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हिटमॅनने 2021 मध्ये भारताकडून खेळल्या गेलेल्या 11 कसोटी सामन्यांच्या 61 डावांमध्ये 906 धावा केल्या होत्या. यंदाच्या कसोटी सामन्यात त्याची सरासरी 47.68 होती तर 161 धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी होती. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये (Test cricket) रोहित शर्माने 2 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.

2010 नंतर ही पहिलीच वेळ असून रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एका वर्षात भारतासाठी धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिला. यादरम्यान विराट कोहलीने सर्वाधिक 8 वेळा हा पराक्रम केला.

2010 ते 2021 पर्यंत भारतासाठी दरवर्षी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू-

2010- सेहवाग (1868)

2011- कोहली (1644)

2012- कोहली (2186)

2013- कोहली (1913)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

SCROLL FOR NEXT