Rohit Sharma & Rishabh Pant
Rohit Sharma & Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला का वगळलं? रोहितने सांगितले कारण

गोमन्तक डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाविरूद्धची (Australia Cricket Team) तीन सामन्यांची टी-ट्वेंटी (T-20) मालिका भारताने (Indian Cricket Team) 2-1अशा फरकाने खिशात घातली आहे. तथापि, तिसऱ्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) याला वगळण्यात आले होते. त्याचे कारण आता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्ट केले आहे.

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यापूर्वी सीरीजमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यास सुरुवात होण्यापुर्वी भारतीय संघात केवळ एक बदल करण्यात आला. विकेटकीपर बॅटर ऋषभ पंतला वगळून त्या जागी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संघात अंतिम 11 मध्ये संधी मिळाली.

त्याविषय़ी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, आधीचा पावसामुळे हा सामना प्रत्येकी 8 षटकांचा झाला. त्यामुळे भुवनेश्वरला संघाबाहेर बसावे लागले होते, आणि पंतचा अंतिम 11 खेळाडूंत समावेश केला होता. हैदराबाद येथे आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामना जिंकणे हेच आमचे लक्ष्य होते. या फॉरमॅटमध्ये विजयाचा मोमेंटम राखणे महत्वाचे होते. नागपुरातील विजयाने आम्हाला आत्मविश्वास मिळाला. ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच आव्हानात्मक राहिलेला आहे. विजयासाठी आम्हाला आमच्या बेसिक्वसवर लक्ष देणे गरजेचे होते. केवळ एक बदल केला, भुवी संघात परतला आहे आणि ऋषभ पंत या सामन्यात खेळणार नाही. गत सामन्यात आम्हाला केवळ चार गोलंदाज खेळवायचे होते. त्यामुळे दुर्दैवाने भुवनेश्वरला बाहेर बसावे लागले होते.

दरम्यान, भुवनेश्वर हा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यानंतर टीकेचे लक्ष्य ठरला होता. त्याने एकही विकेट घेतली नव्हती आणि 49 धावा दिल्या होत्या. तथापि, तिसऱ्या सामन्यात मात्र त्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धशतक झळकावलेला सलामीवीर कॅमेरून ग्रीन याची विकेट घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर तसेच हार्दिक पंड्यान केलेल्या नाबाद 25 धावांच्या फटकेबाजीमुळे हे लक्ष्य एक चेंडू राखून पार केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT