Rohit Sharma Video Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: "अजीब लग रहा है इधर..." वानखेडेवर टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम पाहून 'मुंबईचा राजा' भावूक Watch Video

Rohit Sharma Video: मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि रोहित शर्मा यांचे एक अतूट नाते आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यासाठी जेव्हा रोहित वानखेडेवर पोहोचला.

Sameer Amunekar

मुंबई: मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि रोहित शर्माचं एक अतूट नातं आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यासाठी जेव्हा रोहित वानखेडेवर पोहोचला, तेव्हा एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विश्वचषक २०२६ चा 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणून रोहितने मैदानात पाऊल ठेवलं, मात्र खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमकडे पाहताना त्याला आपल्या भावना अनावर झाल्या.

ड्रेसिंग रूमकडे पाहून रोहितची सूर्या-हार्दिकशी चर्चा

आयसीसीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये रोहित शर्मा अत्यंत भावनिक झालेला दिसत आहे. टी-२० विश्वचषक २०२४ चा विजेता कर्णधार असलेल्या रोहितने आता आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे.

मैदानावर जय शाह यांच्यासोबत ट्रॉफी घेऊन येताना रोहितने ड्रेसिंग रूममध्ये उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे पाहिले. यावेळी रोहित म्हणाला, "इथे उभं राहणं खूप विचित्र वाटतंय... तिथून (ड्रेसिंग रूममधून) इथे येणं... खूप वेगळं वाटतंय." मैदानावर खेळाडू म्हणून असण्याऐवजी पाहुणा म्हणून उपस्थित राहतानाची खंत रोहितच्या शब्दांतून स्पष्ट जाणवत होती.

सूर्याला दिला मैत्रीपूर्ण सल्ला

नाणेफेकीच्या (Toss) वेळी एक मजेशीर आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा क्षण पाहायला मिळाला. कर्णधार सूर्यकुमार यादव पळत रोहितकडे गेला आणि विचारले, "काय करू? फलंदाजी घेऊ का?" यावर रोहित आपल्या खास शैलीत म्हणाला, "फिल्डिंग कर, वेडा आहेस का?" रोहितचा हा 'रोखठोक' सल्ला ऐकून सोशल मीडियावर चाहत्यांनी जुन्या 'कॅप्टन रोहित'च्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भारताचा विजयाने श्रीगणेशा

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अमेरिकेवर विजय मिळवत विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली आहे. मात्र, या सामन्यात भारतीय फलंदाजी काहीशी डगमगलेली पाहायला मिळाली. अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे शून्यावर बाद झाले, तर इशान किशन आणि हार्दिक पांड्याही अपयशी ठरले.

शेवटी कर्णधार सूर्याने ८४ धावांची झुंजार खेळी करत भारताला १६१ धावांपर्यंत नेले. उत्तरादाखल अमेरिकेचा संघ ८ गड्यांच्या बदल्यात १३२ धावाच करू शकला. ३० धावांनी विजय मिळवूनही, रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा संघर्ष प्रकर्षाने जाणवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

SCROLL FOR NEXT