Shoaib Bashir - Rohit Sharma X/EnglandCricket and PTI
क्रीडा

IND vs ENG: 'मी विसा ऑफिसमध्ये नाही, पण आशा आहे...' शोएब बाशिर वादावर स्टोक्सनंतर रोहितचंही भाष्य

Rohit Sharma on Shoaib Bashir: विसा समस्येमुळे पाकिस्तानी मुळचा इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बाशिरला भारतात न येताच इंग्लंडला परतावे लागले आहे. याबद्दल रोहित शर्मा आणि बेन स्टोक्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Ben Stokes reacted on Shoaib Bashir's visa issues:

इंग्लंड विरुद्ध भारत संघात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वी एक वाद निर्माण झाला आहे. याबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या मालिकेसाठी इंग्लंड संघात पाकिस्तानी मुळच्या 20 वर्षीय शोएब बाशिर या फिरकीपटूचीही निवड झाली आहे. त्यामुळे तो या मालिकेतून पदार्पण करेल, अशी चर्चा होती. परंतु, इंग्लंड संघ भारतात पोहचल्यानंतरही त्याला मात्र अद्याप भारतात येता आलेले नाही.

विसाच्या कागदपत्रांच्या समस्येमुळे त्याला अबुधाबीतून परत इंग्लंडला परतावे लागले आहे. तो इंग्लंड संघासह अबुधाबीमध्ये ट्रेनिंग कॅम्पसाठी आला होता. मात्र तिथून इंग्लंड संघातील अन्य खेळाडू हैदराबादमध्ये दाखल झाले. पण बाशिरला येण्याची परवानगी मिळालेली नाही.

आता त्याची समस्या सोडवून तो लवकरात लवकर भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघात सामील ही अपेक्षा रोहित आणि स्टोक्स दोघांनीही व्यक्त केली आहे.

हैदराबादला होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी रोहित बाशिरबद्दल बोलताना म्हणाला, 'मी खरंच त्याला समजू शकतो. तो कदाचीत इंग्लंडच्या संघात पहिल्यांदाच येत होता. नक्कीच हे कोणासाठीही सोपे नाही.'

'आमच्यातील कोणी इंग्लंड येणार असेल आणि त्याला विसा मिळाला नाही, तरी वाईटच वाटेल. दुर्दैवाने, मी विसा ऑफिसमध्ये बसत नाही की तुम्हाला फार माहिती देऊ शकेल. पण मला आशा आहे तो लवकरच इकडे येईल आणि इथे क्रिकेट खेळण्याची मजा घेईल.'

दरम्यान, स्टोक्सने या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, 'जेव्हा अबुधाबीमध्ये आम्हाला ही बातमी कळाली होती, तेव्हा मी म्हणून गेलो की जर बाशिर नसेल तर आपण जायचे नाही. परंतु, ती फक्त माझी भावना होती. तसे केले असते तर ती खूप मोठी गोष्ट झाली असती. आम्ही इकडे येणारच होतो. पण बाशिरला माहित आहे, आमच्या सर्वांचा त्याला पाठिंबा आहे.'

स्टोक्स म्हणाला, 'बाशिरला या सगळ्यातून जावे लागल्याबद्दल मला वाईट वाटत आहे. एक कर्णधार म्हणून जेव्हा तुमच्या संघातील खेळाडूला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, तेव्हा थोडे वाईट वाटते. मला खात्री आहे तो लंडनमध्ये आहे आणि खूप लोक ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतील. आशा आहे की लवकरच तो इथे असेल.'

दरम्यान, इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असून त्यांच्याकडून टॉम हार्टली पदार्पण करणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन -

झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लीच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: पर्वरी येथे 'रेंट-अ-कार' आणि टुरिस्ट टॅक्सीचा अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

Goa ZP Election: गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ! कोलवाळ, हळदोणे, शिरसईत नारीशक्तीचे वर्चस्‍व; सत्तरीतील मतदारसंघांत मोर्चेबांधणी

Yuri Alemao Birthday: ‘नवा गोवा’ घडवूया! वाढदिनी युरींचा संकल्प; व्यासपीठावर विरोधकांची एकजूट, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Ranji Trophy 2025: तेंडुलकर-वासुकीला विकेट, तरी सौराष्ट्राच्या फलंदाजांचे गोव्यावर वर्चस्व; पहिल्या दिवशी भक्कम धावसंख्या

SCROLL FOR NEXT