Rohit Sharma | Ben Stokes | Ollie Pope PTI
क्रीडा

IND vs ENG: 'भारतातील आत्तापर्यंतची सर्वोत्तम खेळी...', केवळ स्टोक्सच नाही, तर रोहितकडूनही पोपवर कौतुकाचा वर्षाव

Ollie Pope: हैदराबाद कसोटीनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रतिक्रिया दिली असून दोघांनीही ऑली पोपचे कौतुक केले आहे.

Pranali Kodre

India vs England, 1st Test Hyderabad:

भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (28 जानेवारी) इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 28 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादला झालेल्या या सामन्यातील विजयामुळे इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, या सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने संघाकडून कुठे चूक झाली, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेही संघाचे कौतुक केले आहे. रोहित आणि स्टोक्स या दोघांनीही ऑली पोपने केलेल्या खेळीचेही कोतुक केले आहे.

या सामन्यात पोपने दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी 196 धावांची खेळी केली होती. त्यामुळे पहिल्या डावातील 190 धावांच्या पिछाडीनंतरही भारतासमोर इंग्लंडने 231 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 202 धावांवरच सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात टॉम हार्टलीने 7 विकेट्स घेतल्या.

सामन्यानंतर रोहित म्हणाला, 'चार दिवस क्रिकेट खेळण्यात आले, त्यामुळे कुठे चूक झाली हे सांगणे कठीण आहे. आम्हाला 190 धावांची आघाडी मिळाली होती. मला वाटते आम्ही सामन्यात होते. ऑली पोपने शानदार खेळी केली, मी भारतीय खेळपट्ट्यांवर विदेशी खेळाडूंच्या पाहिलेल्या शानदार खेळीपैकी ही एक आहे.'

तसेच तो म्हणाला, '230 धावांचा पाठलाग शक्य होता, खेळपट्टीमध्ये फार मदत नव्हती. पण आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. मी आम्ही कुठे गोलंदाजी केली, हे पाहिले. आम्ही योग्य ठिकाणी गोलंदाजी केली होती. गोलंदाजांनी योजना अंमलात आणल्या होत्या. पण तुम्ही नक्कीच पोपच्या खेळीचे कौतुक करायलाच हवे. त्याने खरंच चांगली फलंदाजी केली.'

'आम्ही एक संघ म्हणून पराभूत झालो. तळातील फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, पण वरची फळी गडगडली.'

दरम्यान, रोहितने असेही म्हटले की हा मालिकेतील पहिलाच सामना होता, त्यामुळे आशा आहे की खेळाडू यातून शिकवण घेतील.

बेन स्टोक्स म्हणाला त्याच्या नेतृत्वाच्या कार्यकाळातील हा शानदार विजयांपैकी एक होता. तो म्हणाला, 'भारतात नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ होती. मी आमच्या पहिल्या डावातील शिकवण घेतली. मी पाहिले की भारतीय फिरकीपटू काय करत आहेत, रोहित कसे क्षेत्ररक्षण लावत आहे आणि त्यातील अनेक गोष्टींचा मी आमच्या डावात उपयोग केला.'

'सर्व खुप आनंदी आहेत. टॉम हार्टलीने पदार्पणाच्या सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. ऑली पोप खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करत होता. पण त्यांनी शानदार कामगिरी केली.'

तसेच स्टोक्सने हार्टलीच्या गोलंदाजीबद्दल सांगितले की 'टॉम पहिल्यांदाच संघात आला आहे. त्याला खूप आत्मविश्वास देण्यात आला आहे. मला त्याला मोठे स्पेल द्यायचे होते, मग काहीही झाले असते तरी. आम्हाला संघातील खेळाडूंना पाठिंबा द्यायचा आहे.'

त्याचबरोबर पोपचे कौतुक करताना स्टोक्स म्हणाला, 'मला वाटते, उपखंडात इंग्लिश फलंदाजाने खेळलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ही एक होती.'

तसेच स्टोक्सने एक संदेशही दिला. तो म्हणाला, 'जरी पराभव झाला, तरी तुम्ही सकाळी उठता, तुमचे आयुष्य चांगले सुरू असते, तुम्ही तरीही श्वास घेत असता. त्यानंतर तुम्हाला पुढचा सामनाही खेळायचा असतो. मी अपयशाला घाबरत नाही. मला प्रयत्न करायचे असतात आणि संघात येणाऱ्यांना प्रेरणा द्यायची असते.'

दरम्यान, आता भारत आणि इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमला 2 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT