Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: T20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन' ने केला नवा विक्रम

Rohit Sharma Six: टीम इंडियाचा कर्णधार आणि सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माची गणना जगातील सर्वात खतरनाक फलंदाजांमध्ये केली जाते.

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma Record In International Cricket: टीम इंडियाचा कर्णधार आणि सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माची गणना जगातील सर्वात खतरनाक फलंदाजांमध्ये केली जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने झंझावाती पद्धतीने सामना 6 गडी राखून जिंकला. यामध्ये रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला, जो जगातील दिग्गज फलंदाज मिळवण्यासाठी आसुसलेले आहेत.

रोहित शर्माने हा विक्रम केला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने तुफानी खेळी केली. त्याने मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी केली. रोहितने अवघ्या 20 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 46 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक षटकार मारल्यानंतर रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या (New Zealand) मार्टिन गुप्टिलला मागे टाकले आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आता टी-20 क्रिकेटमध्ये 176 षटकार आहेत.

T20 क्रिकेटचा राजा

रोहित शर्मा हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचबरोबर, T20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक 4 शतके आहेत. त्याच्याकडे ओपनिंगचा अफाट अनुभव सुध्दा आहे. रोहित क्रीजवर सेट झाल्यानंतर धावांचा पाऊस पडतो हे आता समीकरणच बनलं आहे. रोहित शर्मा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने जिंकले

रोहित भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतो. त्याने भारतासाठी 138 सामन्यांमध्ये एकूण 3677 धावा केल्या तर 233 वनडेत 9376 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3137 धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो भारतासाठी अत्यंत विश्वासार्ह फलंदाज बनला आहे.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

176 रोहित शर्मा (भारत)

172 मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड)

124 ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)

120 इयॉन मॉर्गन (इंग्लंड)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT