Dinesh Lad on Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "टीकाकारांना बोलू द्या, त्याला काही सिद्ध करायची गरज नाही" रोहित शर्मा 2027 चा विश्वचषक खेळणार? प्रशिक्षक दिनेश लाड यांनी स्पष्टच सांगितलं

Dinesh Lad on Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या फिटनेसवर आणि वाढत्या वयावर सतत टीका करणाऱ्यांना आता त्याच्या प्रशिक्षकांनीच उत्तर दिले आहे.

Sameer Amunekar

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या फिटनेसवर आणि वाढत्या वयावर सतत टीका करणाऱ्यांना आता त्याच्या प्रशिक्षकांनीच उत्तर दिले आहे. रोहित शर्मा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार का? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून, त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितच्या भविष्यातील नियोजनाबाबत मोठा खुलासा केला आहे. "रोहितला आता कोणासमोरही काही सिद्ध करण्याची गरज नाही," अशा शब्दांत लाड यांनी टीकाकारांना सुनावले आहे.

विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अजूनही कायम

दिनेश लाड यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, रोहित शर्माचे मुख्य ध्येय आता २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हे आहे. रोहितशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत लाड म्हणाले, "त्याच्या मनात त्याच्या करिअरबद्दल आणि ध्येयाबद्दल पूर्ण स्पष्टता आहे.

त्याला एकदा तरी वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावायची आहे. वय वाढत असले तरी त्याच्या फिटनेसवर शंका घेण्याचे काहीच कारण नाही, कारण तो दुखापतीतून सावरून अधिक मजबूत होऊन परतला आहे." आयपीएल २०२६ मध्ये रोहितला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास झाला होता, परंतु त्यानंतर त्याने पुनरागमन केले आहे.

संघातील रोहितच्या महत्त्वाबद्दल बोलताना लाड म्हणाले की, भारताला जर मोठ्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर रोहित शर्माच्या अनुभवाची नितांत गरज आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सुरुवातीला खेळपट्टीवर सेटल व्हावे लागते आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा घ्यावा लागतो. रोहितकडे अशी तंत्रशुद्ध फलंदाजी आहे जी त्याला डावाची बांधणी करण्यास मदत करते. टीकाकारांच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लाड यांनी स्पष्ट केले की, रोहित आजही संघात राहण्यास पूर्णपणे पात्र आहे.

५० षटकांच्या फॉरमॅटचा 'बादशाह'

रोहित शर्माची आकडेवारीच त्याच्या महानतेची साक्ष देते. त्याने आतापर्यंत २८२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.९ च्या सरासरीने ११,५७७ धावा केल्या आहेत. यामध्ये ३३ शतके आणि ६१ अर्धशतकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५० हून अधिक षटकार मारणारा तो भारताचा प्रमुख फलंदाज आहे. आयपीएल २०२६ मध्येही त्याने मोजक्या सामन्यात २८३ धावा करत आपली लय कायम असल्याचे दाखवून दिले होते. आगामी अफगाणिस्तान मालिकेतील त्याचा सहभाग आता त्याच्या फिटनेस अहवालावर अवलंबून असला, तरी २०२७ च्या मिशनसाठी तो सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT