Team India Best Fielder BCCI
क्रीडा

Best Fielder Video: रोहित, जड्डू, सूर्या की केएल? रोबोट कॅमेरानं निवडला द.आफ्रिकेविरुद्ध 'बेस्ट फिल्डर'

Team India Best Fielder: वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील भारताच्या बेस्ट फिल्डर मेडल विजेत्यावर यंदा रोबोट कॅमेरानं शिक्कामोर्तब केले.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs South Africa, Best Fielder Video:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नवी परंपरा सुरु झाली आहे. भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यानंतर संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याकडून ड्रेसिंग रुममध्ये घोषणा केली जाते.

त्यानंतर त्या खेळाडूला मागील विजेत्या खेळाडूकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक दिले जाते. यावेळी अन्य खेळाडू मोठा जल्लोषही करतात. भारतीय संघाने सुरु केलेल्या या परंपरेला चाहत्यांकडूनही उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, प्रत्येक सामन्यानंतर टी दिलीप यांच्याकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची घोषणा विविध पद्धतीने केली जाते.

त्याचनुसार रविवारी (5 नोव्हेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकातामधील ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या सामन्यानंतरही सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची निवड करण्यात आली.

यावेळी विजेत्याची घोषणा करण्यासाठी रोबोट कॅमेरा वापरण्यात आला होता. या रोबोट कॅमेराने भारताचा कर्णधार रोहित शर्माची चार उमेदवारांमधून विजेता म्हणून निवड केली.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 243 धावांनी विजय मिळवल्यानंतर टी दिलीप हे भारतीय संघाचे कौतुक करत आहेत. यावेळी त्यांनी आधी संपूर्ण भारतीय संघाचे कौतुक करताना म्हटले की आपल्या संघाची ताकद संघातील प्रत्येक खेळाडू आहे आणि प्रत्येक खेळाडूची ताकद हा संघ आहे.'

यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या पदकासाठी उमेदवारी मिळवलेल्या खेळाडूंचे टी दिलीप यांनी कौतुक केले. त्यांनी आधी सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. तसेच केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांच्या क्षेत्ररक्षणाचेही कौतुक केले.

त्यानंतर टी दिलीप यांनी रोहितचे कौतुक करताना ते त्याला प्रोफेसर म्हणत असल्याचेही सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की केवळ एक किंवा दोन झेल नाही, तर संघासाठी दिलेले प्रत्येक योगदान महत्त्वाचे असते.

यानंतर सर्वांना त्यांनी बाहेर येण्यास सांगितले. भारतीय संघातील सर्व सदस्य बाहेर आल्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी निवडलेले चार उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले. त्यानंतर रोबोट कॅमेरा यांच्यामध्ये फिरत होता.

यानंतर तो रोहितपाशी येऊन थांबला. त्यानंतर संघातील सर्वच खेळाडूंनी कल्ला केला. त्यानंतर यापूर्वीचा श्रीलंकाविरुद्धच्या पदक विजेता खेळाडू श्रेयस अय्यरने रोहितच्या गळ्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक घातले.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 27.1 षटकात सर्वबाद 83 धावाच करता आल्या. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT