David Warner | Rishabh Pant | Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant to Make Comeback: दिल्ली कॅपिटल्सने केली मोठी घोषणा! IPL 2023 मध्ये ऋषभ पंतची होणार एंट्री

IPL 2023 Rishabh Pant: आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत होता.

Manish Jadhav

Rishabh Pant is Set to Make Comeback in IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत होता.

संघाचा नियमित कर्णधार ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघाताचा बळी ठरला. या घटनेमुळे तो संपूर्ण मोसमातून बाहेर पडला असून डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे कर्णधारपद सांभाळत आहे.

दरम्यान, ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या पुढील सामन्यात तो चाहत्यांमध्ये दिसणार आहे.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना उद्या (4 एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) सहभागी होणार आहे. या सामन्यादरम्यान ऋषभ पंत दिल्लीला सपोर्ट देण्यासाठी स्टेडियममध्ये दिसणार आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने देखील पुष्टी केली आहे की, अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यादरम्यान ऋषभ पंत उपस्थित असेल.

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात असे काही केले

आयपीएल (IPL) 2023 सुरु होण्यापूर्वीच दिल्लीने स्पष्ट केले होते की, संपूर्ण हंगामात पंतची जर्सी त्यांच्याकडे राहील. त्याचवेळी संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी ऋषभ पंतला स्टेडियममध्ये आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. कोचिंग स्टाफ आणि ऑनरलाही त्यांच्या नियमित कर्णधाराची उणीव भासत आहे.

पंत थोडक्यात बचावला

30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास रुरकीच्या नरसन सीमेवरील हम्मादपूर झालजवळ ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली. या अपघातानंतर कारने पेट घेतला आणि या अपघातात पंत गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर त्याला डेहराडूनमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर त्याला विमानाने मुंबईला नेण्यात आले. ऋषभ पंतला सध्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी बराच वेळ लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT