इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऋषभ पंतला आनंदाची बातमी दिली आहे. बीसीसीआयने पंतला आयपीएल 2024 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे घोषित केले आहे.
पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी गंभीर कार अपघात झाला होता. यातून तो सुदैवाने वाचला. मात्र या अपघातात त्याला अनेक जखमा झाल्या. तसेच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली.
त्याचमुळे त्याला एकावर्षापेक्षाही अधिक काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले. त्याला आयपीएल 2023 मध्येही खेळताना आले नव्हते.
अखेर 14 महिन्यांनंतर त्याला खेळण्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिली असून याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या परवानगीशिवाय पंतला पुनरागमन करू शकत नव्हता. पण अखेर त्याला ही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता पंत 2024 आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करतानाही दिसणार आहे.
बीसीसीआयने पंतबद्दल पोस्ट केली आहे की '30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर 14 महिन्याच्या मोठ्या रिहॅब आणि रिकव्हरी प्रकियेनंतर पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आगामी आयपीएल 2024 साठी तंदुरुस्त असल्याचे घोषीत करण्यात येत आहे.'
पंत अपघातानंतर तंदुरुस्ती मिळवण्यासाठी बरेच महिने बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रयत्न करत होता. त्याने काही महिन्यांपूर्वी फलंदाजीलाही सुरुवात केली होती. तसेच त्याने यष्टीरक्षणालाही सुरुवात केली होती. आता तो पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात परतणार आहे.
पंत 2021 पासून दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. पण 2023 मध्ये पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीच्या नेतृत्वाची धूरा सांभाळली होती. आता पंतचे वर्षभरानंतर दिल्ली संघात पुनरागमन होणार आहे.
पंतने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 98 सामन्यांत 34.61 च्या सरासरीने 28.38 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.