Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

ऋषभ पंतने सांगितले वनडे मालिकेतील पराभवाचे खरे कारण

दक्षिण आफ्रिकेने मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केल्यामुळे त्यांना एकूण 287 धावांचे आव्हान देण्यात यश आले.

दैनिक गोमन्तक

कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिकाही गमावली आहे. पारल येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय ODI मध्ये, दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी हाती घेतली. म्हणजेच आता केपटाऊनमध्ये (Cape Town) होणाऱ्या शेवटच्या वनडेत भारतीय संघ क्लीन स्वीप टाळण्यासाठी खेळणार आहे, मालिका जिंकण्यासाठी नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडे मालिकेत टीम इंडियाच्या (Team India) पराभवामागे कोणते एक कारण नव्हते तर उलट या पराभवामागे अनेक कारणे होती. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक 85 धावांची खेळी करणारा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने भारताच्या वनडे मालिकेतील पराभवाचे खरे कारण सांगितले आहे. पंतच्या मते, दक्षिण आफ्रिकेच्या मिडिल ऑर्डर बॅटिंगमुळे दोन्ही संघांमध्ये मोठा फरक पडला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना देखील पार्लमध्येच खेळला गेला, ज्यामध्ये यजमानांनी पाहुण्या संघाचा 31 धावांनी पराभव केला. यानंतर दुसऱ्या वनडेत पुनरागमन अपेक्षित होते. मात्र स्कोअर बोर्डवर 287 धावा लावूनही भारताला विजय मिळवता आला नाही. ऋषभ पंतने सामन्यानंतर कबूल केले की पार्लच्या संथ विकेटवर अनेक धावा पुरेशा होत्या, तरीही आम्ही हरलो.

पंत म्हणाला, “पहिल्या वनडेत आम्ही पाठलाग केला. दुसऱ्या वनडेत आम्ही प्रथम फलंदाजी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली तेव्हा फलंदाजीसाठी विकेट योग्य होती. पण, दुसऱ्या डावात तिचा वेग कमी झाला. दुसऱ्या वनडेतही तेच पाहायला मिळाले. पण दक्षिण आफ्रिकेने मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केल्यामुळे त्यांना एकूण 287 धावांचे आव्हान देण्यात यश आले. मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात आम्हाला अपयश आले म्हणून हा सामना आम्ही हारलो.

डाव्या हाताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने भारतीय गोलंदाजीतील त्रुटी मोजतानाच अश्विन आणि चहल यांच्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्याचे मान्य केले. तो म्हणाला, "केशव महाराज, एडन मार्कराम आणि तबरेझ शम्सी यांनी चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी केली, ज्याचा त्यांना फायदा झाला. त्याच वेळी, त्याला या स्थितीत खेळण्याची देखील सवय आहे.

भारतीय संघाला पन्नास ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी दीर्घ कालावधीनंतर वनडे मालिका गमावण्याचे सर्वात मोठे कारण पंतने सांगितले. तो म्हणाला, आम्ही खूप दिवसांनी वनडे खेळत आहोत, अशा परिस्थितीत संघाबद्दल बरेच काही सांगता येईल. आपल्याला फक्त आपल्या चुका सुधारायच्या आहेत. आशा आहे की येत्या सामन्यांमध्ये आम्ही आमच्या चुका सुधारून सावरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT