Rishabh Pant car accident Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Accident Video: रस्त्याच्या कडेला जळती कार अन् जखमी पंत... अपघाताचा व्हिडिओ आला समोर

पंतच्या कार अपघातादरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे.

Pranali Kodre

Rishabh Pant Car Accident: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी पहाटे कार अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असल्याचे समजले आहे. तो दिल्लीवरून रुडकीला जात असताना त्याचा हा अपघात झाला. दरम्यान त्याच्या अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रिपोर्ट्सनुसार पंतच्या बीएमडब्ल्यू कारचा रुड़कीच्या नारसन बॉर्डरजवळ अपघात झाला. त्यावेळी स्वत: पंत कार चालवत होता. पण डुलका लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर त्याने विंड स्क्रिन तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या कारला नंतर आग लागली आणि या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पण, यात पंतला वाचवण्यात यश आले आहे. अपघाताजवळील काही स्थानिकांनी त्याला लगेचच रुडकीच्या स्थानिक रुग्णालयात हलवले. तिथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

पंतला गरज पडल्यास दिल्लीलाही हलवण्यात येऊ शकते, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितले आहे. पंतला पाठीला, डोक्याला आणि पायाला दुखापती झाल्या असल्याचे समजले आहे.

पंत हा भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. लवकरच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाणार होता. मात्र, त्याआधीच हा अपघात झाल्याने आता त्याला पुढील बरेच महिने क्रिकेट मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.

पंतने आत्तापर्यंत भारताकडून ३३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५ शतकांसह 2271 धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३० वनडे सामने खेळले असून 865 धावा केल्या आहेत. पंतने ६६ आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळला आहेत. यामध्ये त्याने ९८७ धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कोलवाळ तुरुंगात पुन्हा राडा; पाच कैद्यांकडून कैदी मोहम्मद रेहानला मारहाण

Margao Dindi Mahotsav: विठ्ठल विठ्ठल!मडगावात 116 व्या दिंडी उत्सवास प्रारंभ; मंत्री कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलन

Goa Homestay Scheme: गोवा सरकारचे मोठे पाऊल! गावागावांत फुलणार पर्यटन; ‘होमस्‍टे आणि बेड व ब्रेकफास्‍ट’ योजना; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Goa politics: खरी कुजबुज; भाजप श्रेष्ठींपुढे फोंड्याचा पेच

Goa Coconut Price: गोवेकरांवर 'नारळ' का रुसलाय? बाजारात तुटवडा कायम; दर अजून भडकलेलेच

SCROLL FOR NEXT