Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: बांगलादेशला दिवसा तारे दाखवण्यास पंत सज्ज! आस्मानी फटकेबाजी करताना Video Viral

ऋषभ पंत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कसून तयारी करत आहे.

Pranali Kodre

Rishabh Pant: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंतही भारतीय संघात सामील झाला असून त्याने सरावालाही जोरदार सुरुवात केली आहे.

तो या कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशविरुद्धच झालेल्या वनडे मालिकेत खेळला नव्हता. त्याच्या न खेळण्यामागचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केले नव्हते, पण यामागे दुखापत असण्याचा कयास अनेकांनी लावला होता.

पण, आता कसोटी मालिकेसाठी पंतने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तसेच तो कसोटी सामन्याच्या तयारीलाही लागला आहे. त्याचा नेटमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो मोठमोठे शॉट्स खेळताना दिसत आहे.

दरम्यान, पंतची मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील लय चिंताजनक असली, तरी त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी आत्तापर्यंत चांगली राहिली आहे. त्यामुळे आगामी कसोटीतही त्याच्याकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीचीच अपेक्षा असेल.

त्याचबरोबर पंतचे जरी भारतीय संघात पुनरागमन झाले असले, तरी भारतीय संघाला अन्य खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसला आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून तो बाहेर झाला आहे.

तसेच मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाही दुखापतींमुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनच बाहेर झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआयने दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागेवर या कसोटी मालिकेसाठी अभिमन्यू ईश्वरन, सौरभ कुमार, नवदीप सैनी आणि जयदेव उनाडकट यांचा भारतीय संघात समावेश केला आहे.

बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबरदरम्यान चट्टोग्राम येथे होणार आहे. त्यानंतर 22 ते 26 डिसेंबरदरम्यान ढाका येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23 स्पर्धेचा भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पाला वंदन करा... अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT