Rinku Singh | Jasprit Bumrah 
क्रीडा

Rinku Singh: 'तेव्हा आईने उधारीवर पैसे घेतले, मी आता...', टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर रिंकू झाला व्यक्त

Rinku Singh Debut: भारतीय संघात पहिल्यांदात संधी मिळाल्यानंतर रिंकूने त्याच्या कुटुंबियांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

Pranali Kodre

Rinku Singh gratitude for his Mother and family support After Team India call-up:

आयर्लंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची टी20 मालिका शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील डब्लिनला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून रिंकू सिंगने पदार्पण केले. यावेळी त्याने त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या मत मांडले.

रिंकू सिंगला आयर्लंड दौऱ्यासाठी पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली होती. याबद्दल जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत रिंकू म्हणाला, 'हा कॉल येण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली आहे. या खेळप्रती असलेल्या माझ्या जिद्दीने मला पाठिंब्याची कमी असताना आणि अर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत केली आहे.'

'एका गोष्टीने मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे, ती गोष्ट म्हणजे मी माझ्या कुटुंबाला चांगले आयुष्य द्यावे आणि तेव्हाच शक्य होते, जेव्हा मी खेळात पुढे जात राहिल. माझ्यात आत्मविश्वास होता आणि त्याने मला भक्कम बनवले आणि पुढे जाण्यास मदत केली.'

तसेच आयर्लंड दौऱ्यात संधी मिळाल्याने आईचे स्वप्न साकार झाल्याचेही त्याने सांगितले. भारतीय संघातील समावेशानंतर कुटुंबाच्या प्रतिक्रियेबद्दल रिंकू म्हणाला, 'ते खूप खुश होते. माझी आई नेहमी मला म्हणायची की जर भारतीय संघात जागा मिळवायची असेल, तर मला कठोर मेहनत घ्यावी लागेल आणि आता मी भारतीय संघात स्थान मिळवले आहे, त्यामुळे तिचे स्वप्न मी जगत आहे.'

रिंकू पुढे म्हणाला, 'मी माझ्या कुटुंबाचे आर्थिक संघर्ष पाहिले आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मी क्रिकेटद्वारे मदत करू इच्छित होतो. त्यांना समस्यांमधून बाहेर काढण्याच्या तीव्र इच्छेने मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे मला कठोर मेहनत घेण्यासाठी आणि माझे प्रयत्न चालू ठेवण्यासाठी प्रेरणा दिली आहे.'

कारकिर्दीत कुटुंबाचे योगदान मोठे असल्याचे सांगताना रिंकू म्हणाला, 'माझ्या कुटुंबाने माझ्या प्रवासात मोठे योगदान दिले आहे. माझ्या कारकिर्दीसाठी जेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, तेव्हा माझ्या आईने उधारीवर पैसे घेत मला पुढे जाण्यासाठी मदत केली. मी आत्ता जिथे आहे, त्यामागे त्यांच्याकडून मिळालेल्या पाठिंबा हे कारण आहे.

रिंकूने असेही सांगितले की पुढेही मेहनत घेत राहिल आणि फलंदाजीवेळी शांत राहुन जी भूमिका मला दिलेली असेल, ती निभावण्यावर लक्ष केंद्रीत असेल.

दरम्यान, पदार्पणाच्या सामन्यात रिंकूला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आयर्लंडने दिलेल्या 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 6.5 षटकात 2 बाद 47 धावा केलेल्या असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना थांबवावा लागला होता. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार निर्णय घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT