आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि (Kolkata Knight Riders) राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. ज्यामध्ये एका नवख्या खेळाडूची आतापर्यंत चर्चा होत आहे. ज्याचे नाव रिंकू सिंग (Rinku Singh) आहे. रिंकू हा अलीगढचा (Aligarh) रहिवासी आहे. आज सारा देश रिंकूसाठी वेडा झाला आहे, परंतु रिंकूला इथपर्यंतच्या प्रवासाठी त्याच्या वडिलांनी आणि संपूर्ण कुटुंबाने किती मेहनत घेतली हे फार कमी लोकांना माहीत आहे. रिंकूचे वडील ऊन-पाऊस न पाहता सायकलवरुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवत आहेत. वडिलांच्या आणि रिंकूच्या मेहनतीचे फळ आहे की, आज तो आयपीएलमध्ये केकेआर (KKR) संघाचा हिरो बनला आहे.
दरम्यान, रिंकूने राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) 23 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी खेळून कोलकाता नाईट रायडर्सला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. गेल्या पाच सामन्यातील पराभवानंतर रिंकू सिंगच्या स्फोटक फलंदाजीमुळे केकेआरला विजय मिळाला आहे. मात्र, या अष्टपैलू क्रिकेटपटूने आपल्या फलंदाजीनेच नव्हे तर आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणानेही संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंची मने जिंकली आहेत.
रिंकूचा अलीगड ते आयपीएलपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता
रिंकू सिंग एका छोट्या शहरातून आयपीएलमध्ये आला आहे. गेली 5 वर्षे तो सातत्याने क्रिकेटमधील (Cricket) एक एक शिखेर पादाक्रांत करत आहे. परंतु ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा रिंकूने आयपीएलमध्ये आपल्या शानदार फलंदाजीने संघाला विजय तर मिळवून दिलाच पण सामनावीराचा किताबही पटकावला. रिंकूबद्दल बोलायचं झाल्यास, तर तो एका गरीब कुटुंबातून येतो. रिंकू आणि त्याच्या कुटुंबाचा प्रवास संघर्षपूर्ण राहीला आहे. रिंकूचे वडील गॅस एजन्सीमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे.
रिंकू शिकत असताना क्रिकेट खेळायला जायचा
रिंकूला 5 भावंडे आहेत. ज्यामध्ये रिंकू तिसरा आहे. त्याचवेळी रॉयल राजस्थानविरुद्ध रिंकूने नोंदवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सामना झाल्यानंतर माध्यमाशी बोलातना रिंकूचे वडील खानचंद यांनी सांगितले की, ''एकेकाळी रिंकूच्या अभ्यासासाठी पैसे नव्हते. सुरुवातीपासूनच रिंकूला अभ्यासात फारसं स्वारस्य नव्हतं. तो शिक्षण घेत असताना अनेकदा क्रिकेट खेळायला जायचा.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.